Devendra Fadnavis
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेतर्फे दोनशे कोटी रुपयांचे ‘एनएमसी क्लीन गोदावरी बॉन्ड’ चे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई)मध्ये मंगळवारी (ता.२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लिस्टिंग करण्यात आले. या माध्यमातून महापालिकेला निधी उपलब्ध होऊन विविध विकासकामे मार्गी लावता येणार आहेत. म्युनिसिपल बॉन्ड इश्यू करणारी नाशिक महापालिका राज्यात तिसरी ठरली आहे. ‘एनएसई’मध्ये नोंद महाराष्ट्राच्या अभिमानाचा क्षण असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.