NMC News : नाशिक शहरात रस्ते खोदाईसाठी विशिष्ट भागातच परवानगीचा निर्णय!

रस्त्यांच्या साइड पट्ट्यामध्येच खोदकामासाठी परवानगी दिली जाणार असून अपवादात्मक परिस्थितीत रस्ता खोदायचा असेल तर महापालिकेच्या यंत्रणांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Road Construction
Road Constructionesakal

नाशिक : शहरात आता रस्ते खोदण्यासाठी विशिष्ट भागातच परवानगी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रस्त्यांच्या साइड पट्ट्यामध्येच खोदकामासाठी परवानगी दिली जाणार असून अपवादात्मक परिस्थितीत रस्ता खोदायचा असेल तर महापालिकेच्या यंत्रणांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. (NMC Decision to permit road digging in Nashik city only in specific areas)

महापालिकेकडून दरवर्षी रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी, मोबाईल कंपनी, बीएसएनएल तसेच विविध मोबाईल कंपन्यांच्या वतीने विविध प्रयोजनासाठी रस्ते खोदले जातात.

रस्ते खोदताना महापालिकेकडे तोडफोड फी अदा केली जात असली तरी रस्ते खोदताना आकारमानाचा विचार न करता चुकीच्या पद्धतीने रस्ते खोदले जातात. परिणामी महापालिकेला अतिरिक्त खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागतोच.

मात्र पावसाळ्यामध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. चुकीच्या पद्धतीने रस्ते खोदल्यास खड्डे पडतात त्या शिवाय चांगले रस्ते देखील उखडतात ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने ऍक्शन प्लॅन तयार केला आहे.

असे खोदकाम करण्यासाठी एक आचारसंहिता तयार केली असून परवानगीपेक्षा अधिक खोदकाम केल्यास अतिरिक्त दंड आकारला जाणार आहे.

Road Construction
NMC News : महापालिकेत जाहिरात फलक घोटाळा; समितीमार्फत होणार चौकशी

साइड पट्टीत एक मीटरपर्यंत परवानगी

महापालिका हद्दीमध्ये रस्ता खोदायचा असल्यास साइड पट्टीमध्ये साधारण एक मीटरपर्यंत रस्ता खोदण्यासाठी परवानगी आहे. परंतु प्रत्यक्षात जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम करताना अतिरिक्त खड्डा खोदला जातो.

त्याशिवाय साईडचे रस्तेदेखील उखडले जातात. अनेक ठिकाणी जलवाहिनी व मलजलवाहिनीची तोडफोड होत असल्याने नुकसान होते. त्यामुळे महापालिकेने आता साइड पट्टीमध्येच अनुज्ञेय असलेले खोदकाम करणे बंधनकारक केले आहे.

यावर नजर ठेवण्यासाठी महापालिकेने आचारसंहिता तयार केली असून विशिष्ट टीम या खड्डे खोदाईवर नजर ठेवणार आहे.

"रस्त्याच्या बाजूला खड्डा खोदण्यासाठी विशिष्ट माप आहे. मात्र त्याचे उल्लंघन होत असल्याने चुकीच्या पद्धतीने खोदकाम करणाऱ्यांवर विभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे."- शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, महापालिका.

Road Construction
NMC News : चालु आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक वादात! महापालिकेला 23 फेब्रुवारीपर्यंत म्हणणे मांडण्याची संधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com