NMC Election 2022 : अंतिम मतदारयादी प्रसिद्धीसाठी 21 जुलैपर्यंत मुदतवाढ

NMC latest marathi news
NMC latest marathi newsesakal

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी (NMC election) जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयाद्यांच्या (Draft Voter list) अंतिम प्रसिद्धीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून, आता २१ जुलैपर्यंत अंतिम मतदारयाद्या (voter list) प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (NMC Election 2022 Extension of deadline till July 21 for publication of final voter list Nashik latest news)

महापालिका निवडणुकीसाठी २३ जूनला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. ४४ प्रभागनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या. ३, ८४७ हरकतींचा पाऊस ३ जुलैपर्यंत पडला. यात सर्वाधिक हरकती सिडको विभागातून प्राप्त झाल्या.

सिडकोत दोन हजार ४३३, पूर्व विभागात २८४, पश्चिम विभागात ४६, पंचवटी विभागात ३९६, नाशिक रोड विभागात २२२, सातपूर विभागात १५५, तर महापालिकेच्या ट्रू वोटर्स ॲपवर ३५२ याप्रमाणे हरकती प्राप्त झाल्या.

NMC latest marathi news
Crime Update : चरस बाळगल्याप्रकरणी आरोपींना 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

हरकतींची संख्या लक्षात घेता महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी हरकतींची छाननी, प्रत्यक्ष स्थळ पाहणी, पंचनाम्याची संपूर्ण प्रक्रिया निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यासाठी ९ जुलैची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, हरकतींची संख्या लक्षात घेता १६ जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली होती. शनिवारी (ता. १६) अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पूर्णपणे तयारी करताना प्रशासन उपायुक्त यांच्याकडे तीन हजार ८४७ हरकतींची चौकशी पूर्ण करत अहवाल सादर केला.

त्यापूर्वी महापालिकेने चौकशी अहवालाची छाननी करून कंट्रोल चार्ट बनविण्यासाठी वेळ मागितली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने नाशिकसह पुणे व पिंपरी चिंचवड यातील महापालिकांना अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यासाठी आता २१ जुलैची मुदतवाढ दिल्याची माहिती प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांनी दिली.

NMC latest marathi news
OBC लोकसंख्या 54 % असून मिळावे हक्काचे 27 टक्के आरक्षण : छगन भुजबळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com