NMC Encroachment Department : अतिक्रमण हटाव मोहीम होणार तीव्र!

NMC News
NMC News esakal
Updated on

नाशिक : औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल मिरचीजवळ घडलेल्या अपघातानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला जाग आली असून उशिरा सुचलेल्या शहाणपणाचा भाग म्हणून चौक, चौकांमध्ये व रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्याच्या सूचना सहा विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात सहा विभागीय अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. (NMC Encroachment Department campaign to remove encroachment after Bus fire accident Nashik Latest Marathi New)

शहरातील सर्व चौकांमध्ये वाहतुकीस अडथळा निर्माण होणारे फलक हटविणार असून, अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. नाशिक औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल मिरची चौकात खासगी ट्रॅव्हल्स बसला अपघात होऊन बसला लागलेल्या आगीमध्ये 12 जणांचा दुर्दैवी अंत झाला, तर 48 लोक गंभीर जखमी झाले. अपघाताच्या पार्श्वभूमिवर महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महामार्ग तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणाचा आढावा घेऊन तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. वाहतुकीला अडथळा होऊन अपघातास कारणीभूत असलेले अनधिकृत होर्डिंग, बॅनर, पक्के बांधकामे हटविण्याबाबत त्वरित कारवाई करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या. कारवाई करताना अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व नगर नियोजन विभागाच्या व विभागीय अधिकाऱ्यांनी अतिक्रमण कारवाईचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

NMC News
SAKAL Exclusive : सावधान! 5G SIM Updateच्या नावाने बसतोय गंडा

टपऱ्या, अनधिकृत होर्डिंगवरही कारवाई

विभागीय अधिकारी तसेच नगरनियोजन विभाग मनपा कार्यक्षेत्रातील सहाही विभागातील चौकांमध्ये समोर असणाऱ्या अतिक्रमित टपऱ्या, अनधिकृत बॅनर, होर्डिंग तसेच महामार्गावरील चौक आदींची यादी तातडीने मुख्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सहा विभागातील चौकातील अतिक्रमणे त्वरित आठवण कार्य तत्परतेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

या भागात पक्के बांधकामाचे अतिक्रमण आहे तेथे नगर नियोजन विभागाने डीमार्केशन करण्याच्या सूचना दिल्या. पूर्व विभागीय अधिकारी नितीन नेर, पश्चिम विभागाचे मदन हरीश्चंद्र, सिडकोचे मयूर पाटील, सातपूर विभागाच्या जयश्री बैरागी, नाशिक रोडचे सुनील आव्हाड, पंचवटी विभागाचे विभागीय अधिकारी कैलास राबडीया या वेळी उपस्थित होते.

NMC News
Sakal Exclusive : शालेय पोषण आहारचा भार प्रभारीवर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com