NMC Fire Department : 1 लाख लोकसंख्येमागे 6 अग्निशमन कर्मचारी; महापालिकेची दयनीय अवस्था

NMC News
NMC Newsesakal

NMC Fire Department : महापालिकेत वैद्यकीय व अग्निशमन विभागातील जवळपास ७०४ पदे भरण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला असला तरी अद्यापही त्या जागा भरल्या जात नाही. परिणामी दोन्ही महत्त्वाच्या व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.

त्यात अग्निशमन विभागाचा विचार केल्यास वीस लाख लोकसंख्येची अग्नीसुरक्षा अवघ्या ११८ अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या हाती असल्याचे भयावह वास्तव आहे. (NMC Fire Department 6 fire personnel per 1 lakh population pathetic condition of municipality nashik news)

शहराचा विस्तार वाढत असताना पायाभूत सेवा- सुविधा भक्कम करणे आवश्यक आहे. त्यातल्या त्यात नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सेवांचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. या सेवांचे सक्षमीकरण मनुष्यबळाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.

अग्निशमन विभागाचा विचार केल्यास नाशिक महापालिकेच्या दृष्टीने सर्वाधिक दयनीय अवस्था या विभागाची झाली आहे. महापालिकेच्या पहिल्या विकास आराखड्यामध्ये १६१ विविध संवर्गातील पदे मंजूर होती.

सेवानिवृत्ती व अन्य कारणामुळे सध्या ९० फायरमन व लीडिंग फायरमन तसेच २७ ड्रायव्हर व एक अधिकारी असे ११८ लोक अग्निशमन विभागांसह शहराच्या अग्नी सुरक्षेचा भार सांभाळत आहे.

अत्यावश्यक सेवा म्हणून राज्य शासनाने वैद्यकीय व अग्निशमन विभागातील पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्याअनुषंगाने नवीन ३४८ पदे मंजूर करण्यात आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस माध्यमातून ही पदे भरली जातील.

जुलै महिन्यात भरती प्रक्रिया सुरू होईल. त्याअनुषंगाने अग्निशमन विभागाच्या पदांचा आढावा घेतला असता एक लाख लोकसंख्येमागे सहा अग्निशमन कर्मचारी असल्याची बाब समोर आली आहे. कर्मचाऱ्यांसंदर्भातील सदर परिस्थिती गंभीर असून तातडीने पदे भरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ही महत्त्वाची पदे आहेत रिक्त

फायरमॅन, लीडिंग फायरमन, चालक किंवा यंत्रचालक, वायरलेस ऑपरेटर, सब ऑफिसर्स, स्टेशन ऑफिसर, फायर ऑफिसर, डेप्युटी फायर ऑफिसर. अग्निशमन विभागात आकृतिबंधातील १६१ पदे व नव्याने मंजूर करण्यात आलेली ३४८ असे एकूण ५०९ पदांचा आकृतिबंध निर्माण झाला आहे.

सद्यःस्थितीत जवळपास ३९१ पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने लवकर रिक्त पदांची भरती झाल्यास अग्निशमन यंत्रणा कोलमडण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.

"अग्निशमन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची आवश्यकता आहे. शासनाच्या अध्यादेशानुसार टीसीएस कंपनीच्या माध्यमातून रिक्त पदे भरली जातील. मात्र जोपर्यंत पदे भरली जात नाही तोपर्यंत परिस्थिती चिंताजनक आहे."

- संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com