NMC News: पालकमंत्र्यांच्या सौंदर्यीकरणाच्या महत्त्वकांक्षेला ब्रेक!

निधीची तरतूद नाही तरी, शहर सुंदर बनविण्यासाठी धडपड
Dada Bhuse & NMC
Dada Bhuse & NMCesakal

NMC News : पालकमंत्री दादा भुसे यांनी ठाणे शहराच्या धर्तीवर नाशिक शहराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी आश्वासक पावले उचलून महापालिकेला विविध सूचना केल्या असल्या तरी आयुक्त नसल्याने सौंदर्यीकरणाच्या कामांसाठी नवीन आर्थिक तरतूद करता येत नाही.

त्यामुळे जोपर्यंत निधीची तरतूद नाही, तोपर्यंत सौंदर्यीकरणाची कामे हाती घेता येणार नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या सौंदर्यीकरणाच्या महत्वकांक्षेला ब्रेक लागला आहे. (NMC News Break to beautification ambition of guardian minister bhuse no fund nashik news)

शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पंधरा दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांच्या जलसंपदा विभागाच्या कार्यालयात बैठका घेतल्या. बैठकीत शहरातील चौक विकसित करून शहराचे सौंदर्य व स्वच्छता करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले.

त्याला प्रतिसाद म्हणून शहरातील काही व्यक्तींनी सहभाग नोंदवत पुढाकार घेतला. महापालिकेने शहरातील ६४ वाहतूक बेटे व रस्ता दुभाजकसंदर्भात जाहीर केलेल्या निविदांना प्रतिसाद दिला. सामाजिक दायित्वाच्या निधीतून चौकांचे सुशोभीकरण केले जाणार आहे.

त्याचबरोबर ठाणे शहरामध्ये उड्डाणपुलाखाली महापालिकेने सुशोभीकरण केले आहे. रंगरंगोटी तसेच फुलझाडे लावण्यात आल्याने शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडली आहे. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेकडूनदेखील सौंदर्यीकरण करण्याचे काम हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पाथर्डी फाटा ते आडगाव दरम्यान उड्डाणपूल तसेच दत्तमंदिर ते सिन्नर फाटा या दरम्यानच्या उड्डाणपुलाखाली रंगरंगोटी तसेच फुलझाडे लावून सौंदर्यीकरण केले जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dada Bhuse & NMC
NMC Kumbha Mela Fund Audit: सिंहस्थाच्या निधीचे ऑडिटच नाही! माहितीच्या अधिकारातून बाब उघड

परंतु पालकमंत्र्यांच्या बैठकीत सौंदर्यीकरणाच्या विविध विकासकामांना होकार दिला असला तरी प्रत्यक्षात कामे करण्याची वेळ आली त्या वेळी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून ‘हात’ वर करण्यात आले आहे.

आयुक्त नसल्याने निधीसाठी अडचण

सौंदर्यीकरणाच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर पंधरा दिवसांनी कामाची प्रगती विचारण्यासाठी ठराविक अधिकाऱ्यांची बैठक पालकमंत्री कार्यालयात बोलाविली. बैठकीला महापालिकेचे अधिकारी उपस्थित राहीले.

त्या वेळी महापालिकेने निधी खर्च करून सुशोभीकरण करावे ही बाब समजल्यानंतर महालिकेकडे निधीची तरतूदच नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले.

त्यामुळे पालकमंत्र्यांच्या सुशोभीकरणाच्या कामाला ब्रेक लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात आता आयुक्तपददेखील रिक्त असल्याने निधी तरतूद करण्याची कुठलीच चिन्हे दिसत नाही.

Dada Bhuse & NMC
NMC Water Tap Connection: अनधिकृत नळजोडणी नियमितीकरणाचा प्रयोग फसला! 45 दिवस मुदतवाढ देण्याची नामुष्की

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com