NMC Pest Control : वादग्रस्त पेस्ट कंट्रोल ठेक्याला अखेर मुहूर्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC Latest News

NMC Pest Control : वादग्रस्त पेस्ट कंट्रोल ठेक्याला अखेर मुहूर्त

नाशिक : मागील तीन वर्षांपासून सातत्याने मुदतवाढ देत असलेल्या पेस्ट कंट्रोलच्या ठेकेला अंतिमतः मंजुरी मिळाली आहे.

प्रशासनाने चौथ्यांदा काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत सिडको, सातपूर व पश्चिम विभागासाठी एस. आर., तर पूर्व पश्चिम व नाशिक रोड विभागासाठी मेसर्स दिग्विजय एंटरप्राइजेस पात्र ठरले आहे. (NMC Pest Control Controversial pest control contract finally due nashik news)

महापालिकेच्या ३४ कोटींच्या पेस्ट कंट्रोल ठेक्याचे टेंडर मंगळवारी (ता. ७) उघडण्यात आले. मागील तीन टेंडर रद्द करण्यात आल्याने या चौथ्या टेंडरमध्ये दोन विभागांसाठी सहभाग घेतलेल्या प्रत्येकी तीन कंपन्यांपैकी दोन- दोन कंपन्या कागदपत्र तपासणीत अपात्र ठरल्या.

पंचवटी पश्चिम व नाशिक रोड या विभाग एकमधील ठेक्यासाठी दिग्विजय एन्टरप्रायजेस व सिडको सातपूर व पश्चिम या विभाग दोनसाठी एसआर पेस्ट कंट्रोल लिमिटेड या कंपन्या पात्र ठरल्या आहेत.

महापालिकेच्या मलेरिया विभागातर्फे राबवलेल्या या टेंडर प्रक्रियेतील हे चौथे टेंडर असल्याने प्रत्येकी एक कंपनी पात्र ठरूनही आता वित्तीय लिफाफा उघडला जाणार आहे. त्यानंतर तडजोडीनंतर टेंडर प्रक्रियेतील अटी- शर्ती मान्य करणाऱ्या कंपनीला कार्यारंभ आदेश दिले जातील.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

मागील तीन ते साडेतीन वर्षांपासून पेस्ट कंट्रोल सातत्याने सहा, सहा महिन्यांची मुदतवाढ देऊन दिग्विजय एंटरप्राइजेसला सोईस्कर असे निर्णय घेतले जात आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये त्याची मुदत संपली. त्यानंतर नवीन प्रस्ताव तयार करताना १८ कोटींचा ठेका तब्बल ४६ कोटींवर पोचला.

त्यामुळे तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काढलेल्या फेरनिविदेला दिग्विजय एंटरप्राइजेसने न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर पेस्ट कंट्रोलच्या खर्चात कपात करून ४६ कोटी रुपयांवरून ३३ कोटी रुपयांवर ठेक्याची किंमत आणली.

टॅग्स :Nashiknmc