NMC Property Tax Recrovery : नाशिक रोडला 17 लाख थकबाकी वसूल

nmc property tax latest marathi news
nmc property tax latest marathi newsesakal

नाशिक : महापालिकेच्या विविध विभागाच्या माध्यमातून दिवाळीत सुरू करण्यात आलेली ढोल बजाव मोहीम स्थगित करण्यात आल्यानंतर आता पुन्हा नव्याने सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी (ता. १७) थकबाकीदारांच्या दारासमोर ढोल वाजून जवळपास १७ लाख रुपये वसूल करण्यात आले. (NMC Property Tax dhol bajao Recovery 17 lakhs dues recovered from Nashik Road)

nmc property tax latest marathi news
Nashik News: लाकडी फळ्यांच्या गुदामाला आग

मालमत्ता कराची थकबाकी ३०० कोटी रुपयांवर पोचली आहे. त्या पार्श्वभूमीवर वसुली करण्यासाठी महापालिकेने थकबाकीदार मिळकत धारकांच्या घरासमोर ढोल बजाव मोहीम राबवण्यास सुरवात केली. दिवाळीच्या कालावधीत मोहीम स्थगित करण्यात आली होती. १७ नोव्हेंबरला नाशिक रोड विभागात मोहीम राबविण्यात आली.

येथून १७ लाख २४ हजार ७६४ रुपये थकबाकी वसूल करण्यात आली. घरपट्टी विभागाचे सहाय्यक अधीक्षक शरदकुमार जाधव, राकेश पवार, हेमंत रौंदळ, नाना पोरजे, शरद मरसाळे, महेंद्र शिंदे, अभिजित देशमुख, मुकुल लोखंडे, विजय बोराडे, रवींद्र गोसावी, स्वप्नील कोठुळे, रवींद्र गांगुर्डे, तेजस गांगुर्डे, रोहित ताठे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

nmc property tax latest marathi news
Nashik : रामकुंड नव्हे...रामतीर्थ!; तीर्थांच्या स्‍थान निश्‍चितीतून गोदावरी होणार प्रवाहित!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com