
नाशिक : गेल्या नऊ दिवसांपासून घराघरांत विराजमान असलेल्या लाडक्या गणरायाला शुक्रवारी (ता. ९) भावपूर्ण निरोप दिला जाणार असून, त्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. या स्वच्छतेचा भाग म्हणून ७१ ठिकाणी नैसर्गिक व कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविण्याबरोबरच स्वच्छता करण्यात आली आहे.
नदी किनाऱ्यावरील धोकादायक ठिकाणी १६ जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, पीओपी मूर्तीचे विघटन करण्यासाठी अमोनिअम कार्बोनेट विभागीय स्तरावर मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. (NMC ready to farewell to beloved father Creation of artificial lakes Nashik Latest Marathi News)
दोन वर्षाच्या कोरोनानंतर यंदा धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. लाडक्या गणरायाला शुक्रवारी भावपूर्ण दिला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने गुरुवारी (ता. ८) तयारीवर अंतिम हात फिरविला. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विशेष बैठक घेऊन सूचना दिल्या आहे.
पर्यावरणपूरक उत्सवासाठी २७ ठिकाणी नैसर्गिक, तर ४३ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. विसर्जन स्थळांवर महापालिका कर्मचाऱ्यांसह स्वयंसेवी व सामाजिक संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. मूर्ती व निर्माल्य संकलन केले जाणार आहे. पीओपी मूर्ती, तसेच मूर्तीवर रासायनिक रंगद्रव्ये असल्याने जलप्रदूषण होते.
त्यामुळे गणेशमूर्ती नदीमध्ये विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. दान केलेल्या मूर्ती ठेवण्यासाठी सुयोग्य जागेची मंडप व्यवस्था करण्याबरोबरच वाहतूक करण्यासाठी आवश्यक कर्मचारी व वाहने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विभागीय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. दान झालेल्या मूर्तींचे विधिवत विसर्जन केले जाणार आहे.
देखरेखीसाठी सहा अधिकारी
श्री गणेश मूर्तींचे संकलन निर्माल्य संकलन वाहतूक कामकाजाची देखरेख व नियंत्रण करण्यासाठी सहा विभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासन उपायुक्त मनोज घोडे पाटील यांच्याकडे सिडको, विविधकर उपायुक्त अर्चना तांबे यांच्याकडे सातपूर, अतिक्रमण उपायुक्त करुणा डहाळे यांच्याकडे नाशिक पश्चिम, समाज कल्याण उपायुक्त दिलीप मेणकर, यांच्याकडे नाशिक रोड तर उद्यान उपायुक्त डॉ विजयकुमार मुंडे यांच्याकडे पंचवटी तर मुख्य लेखा परीक्षक बोधीकिरण सोनकांबळे यांच्याकडे नाशिक पूर्व विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
विभागनिहाय पारंपरिक व नैसर्गिक स्थळे-
* पूर्व विभाग- लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठ परिसर, नंदिनी- गोदावरी संगम.
* नाशिक रोड विभाग- दसक घाट, चेहेडीगाव दारणा नदी, देवळालीगाव, विहीतगाव, वडनेरगाव (वालदेवी नदी).
* पंचवटी विभाग- म्हसरूळ- सीता सरोवर, नांदूर मानूर, आडगाव पाझर तलाव, तपोवन, रामकुंड परिसर, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर सांडवा.
* सिडको विभाग- पिंपळगाव खांब वालदेवी घाट.
* पश्चिम विभाग- यशवंत महाराज पटांगण, रोकडोबा पटांगण, कपूरथळा पटांगण, गाडगे महाराज धर्मशाळा, टाळकुटेश्वर पटांगण, सिद्धेश्वर मंदिर घारपुरे घाट, हनुमान घाट.
* सातपूर विभाग- गंगापूर धबधबा, गंगापूर अमरधाम, सोमेश्वर, चांदशी पूल, मते नर्सरी.
विभागनिहाय कृत्रिम तलाव-
* पूर्व विभाग- लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठ, रामदास स्वामी नगर लेन- १, नंदिनी गोदावरी संगम, साईनाथनगर चौफुली, डीजीपीनगर गणपती मंदिराजवळ, शारदा शाळेसमोर राणेनगर, कलानगर चौक राजसारथी.
* नाशिक रोड विभाग- नारायण बापू चौक, चेहेडी ट्रक टर्मिनल, निसर्गोपचार केंद्र जयभवानी रोड, शिखरेवाडी ग्राउंड, गाडेकर मळा,
मनपा शाळा क्रमांक १२५ मैदान, राजराजेश्वरी चौक, के. एन. केला शाळेमागील प्रस्तावित भाजी मार्केट.
* पंचवटी विभाग- राजमाता मंगल कार्यालय, गोरक्षनगर, आरटीओ कार्यालय पेठरोड, कोणार्कनगर, प्रमोद महाजन उद्यान, रामवाडी जॉगिंग ट्रॅक शेजारी.
* सिडको- गोविंदनगर जिजाऊ वाचनालय, राजे छत्रपती व्यायामशाळेजवळ जुने सिडको, पवननगर जलकुंभ, राजे संभाजी स्टेडिअम, मीनाताई ठाकरे शाळा कामटवाडा, डे केअर शाळा राजीवनगर, राजे संभाजी महाराज व्यायामशाळेजवळ कर्मयोगीनगर.
* पश्चिम विभाग- चोपडा लॉन्स पूल गोदापार्क, चव्हाण कॉलनी परीची बाग, फॉरेस्ट नर्सरी गंगापूर रोड, बॅडमिंटन हॉल येवलेकर मळा, दोंदे पूल उंटवाडीरोड, महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ, लायन्स क्लब पंडित कॉलनी, शीतलादेवी टाळकुटेश्वर मंदिर.
* सातपूर विभाग- पाइपलाइन रोड रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ, शिवाजीनगर धर्माजी कॉलनी, अशोकनगर पोलिस चौकी, नंदिनी नासर्डी नदी पूल सातपूर- अंबड लिंक रोड, नंदिनी नासर्डी नदी पूल, आयटीआय पूल, शिवाजीनगर पाझर तलाव.
सोळा जीवरक्षक नियुक्ती
जीवरक्षक व त्यांची नियुक्तीची ठिकाणे : रूपचंद काठे (व्यवस्थापक), अरुण पवार (सोमेश्वर धबधब्या समोर), शंकर पाटील (सोमेश्वर महादेव मंदिर परिसर) क्रांती न्याहारकर (आनंदवली पूल परिसर) शिल्पा सुभेदार (अतिरिक्त व्यवस्थापक), संजय पाटील (रोकडोबा तालीम परिसर), अनिल निगळ (केटीएचएम कॉलेज नदी परिसर), शांतवन शिंदे (रोकडोबा तालीम परिसर), सुनील दिघे (हनुमान घाट, घारपुरे घाट), दशरथ दिघे (गांधी तलाव परिसर), कुंदन दळे (यशवंतराव महाराज पटांगण), नितीन निकुंभ (हनुमान घाट, घारपुरे घाट), माया जगताप (अतिरिक्त व्यवस्थापक), रवींद्र ठाकरे (वालदेवी नदी, वडनेर परिसर), अशोक भडांगे (दारणा नदीवरील चेहेडी पंपिंग परिसर), सुनंदा मालसाने (अतिरिक्त व्यवस्थापक), वाळू नवले (वालदेवी नदीवरील पाथर्डी दाडेगाव परिसर), गिरीश चव्हाण (पाथर्डी दादेगाव परिसर).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.