NMC News: गर्दी विकेंद्रीकरणासाठी फेरीवाला झोनची पुनर्रचना! पथविक्रेत्यांचेही फेरसर्वेक्षण

hawkers and street vendors
hawkers and street vendorsesakal

नाशिक : शहरातील बाजारपेठांमध्ये होणाऱ्या गर्दीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून नव्याने फेरीवाला झोन तयार केले जाणार आहे. यात नवीन नगरामध्येदेखील फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होणार आहे.

२००९ पासून महापालिका हद्दीमध्ये फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. त्यासाठी फेरीवाला समिती गठित करून समितीमार्फत फेरीवाल्यांची बायोमेट्रीक नोंदणी करण्यात आली. त्यानुसार शहरात एकूण ८, ५९६ फेरीवाल्यांची नोंद करण्यात आली. (NMC Reorganization of hawker zones for crowd decentralization Resurvey of street vendors also nashik)

फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी २२५ फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्यात आली. परंतु फेरीवाला क्षेत्र निश्चित करताना, ज्या भागात ग्राहकांची संख्या तुरळक आहे. अशा भागात फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्यात आली.

यातील ८३ फेरीवाला क्षेत्रात एकाही फेरीवाल्याने प्रवेश केला नाही. त्यामुळे फेरीवाला क्षेत्रांची पुनर्रचना करण्याचा व नवीन नगरामध्ये फेरीवाला क्षेत्र निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी तीन टप्प्यात फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.

२०१४ मध्ये पहिल्या टप्प्यात ९, ६२० फेरीवाल्यांची नोंद करण्यात आली होती. २०१७ मध्ये दुसरा टप्पा पार पडला. त्यात २, ९२६ फेरीवाल्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली.

२०२२ मध्ये तिसऱ्या टप्प्यात १, ३३७ फेरीवाल्यांची नोंद करण्यात आल्यानंतर एकूण १३,८८३ फेरीवाल्यांची बायोमेट्रीक पद्धतीने नोंदणी करण्यात आली. यामध्ये छाननीनंतर ५,२८७ दुबार व बोगस फेरीवाल्यांची नोंदणी रद्द करण्यात आली. त्यामुळे सद्यःस्थितीत ८,५९६ फेरीवाल्यांची नोंद आहे.

"फेरीवाला क्षेत्रासाठी नवीन जागा सुचविण्यात आल्यानंतर फेरीवाला क्षेत्रांची पुनर्रचना करण्यात येत आहे. महापालिका व वाहतूक पोलिसांच्या संयुक्त पाहणीनंतर कार्यवाही होईल."

- नितीन नेर, उपायुक्त, महापालिका.

hawkers and street vendors
Nashik News: सटाणा वळण रस्ता बायपासमुळे शहर सौदर्यीकरणाला बूस्ट!

असे आहेत फेरीवाला क्षेत्र-

मुक्त फेरीवाला क्षेत्र- १६६

वेळ व तारखेनुसार प्रतिबंधित फेरीवाला क्षेत्र- ५९

ना फेरीवाला क्षेत्र- ८३

फेरीवाला क्षेत्रांची सद्यःस्थिती

फेरीवाला क्षेत्र निश्चित झालेल्या जागांची संख्या- २२५

प्रत्यक्षात सुरू असलेले फेरीवाला क्षेत्र- १३२

प्रतिसाद न लाभलेले फेरीवाला क्षेत्र- ८३

वाटप करणे बाकी असलेले फेरीवाला क्षेत्र- १०

फेरीवाला क्षेत्र व फेरीवाल्यांची विभागनिहाय संख्या

विभाग फेरीवाला क्षेत्र फेरीवाल्यांची संख्या

पंचवटी ५० २०७३

पूर्व १८ ६१९

नाशिकरोड ५२ १०७७

पश्चिम ४६ २१०९

सिडको ३१ ९३८

सातपूर २८ १७८०

--------------------------------------------------------

एकूण २२५ ८५९६

hawkers and street vendors
Rajya Natya Spardha: ‘युद्धविराम’मधून ट्रॉयच्या महाराणीची अस्वस्थता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com