पावसाळ्याच्या तोंडावर तपोवनात महापालिकेचे बेघरांसाठी निवारा केंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tapovan

पावसाळ्याच्या तोंडावर तपोवनात महापालिकेचे बेघरांसाठी निवारा केंद्र

नाशिक : शहरातील बेघरांना निवाऱ्याची (Shelter) व्यवस्था करून देण्यासाठी शहरातील पंचवटीतील इंद्रकुंड व संत गाडगे महाराज आश्रम येथे बेघरांसाठी निवारा केंद्र आहे. पावसाचा हंगाम (Monsoon Season) असल्याने तपोवनातील निवारा केंद्र लवकरच सुरू होणार असून, गाडगे महाराज निवारा केंद्रातील बेघरांना नव्याने झालेल्या इमारतीत हलवले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या उपायुक्त करुणा डहाळे यांनी दिली. (NMC shelter for homeless in Tapovan for monsoon Nashik News)

न्यायालयाच्या आदेशानुसार देशात बेघरांच्या निवाऱ्याची सोय करण्यासाठी प्रत्येक महापालिकेत निवारा केंद्राची संकल्पना राबविण्यात येत आहे. महापालिकेने पावसाळ्यात तपोवनात नव्याने दोन मजली इमारत निवारा केंद्रासाठी बांधली आहे. तेथे बेघर व्यक्तींची जेवणासह राहण्याची सोय असणार आहे. या इमारतीच्या समोरील भागात सिटीलिंक बसचे टायर व इतर साहित्य पडले असल्याने ते लवकर उचलून घेण्यात यावे. असे पत्र महापालिकेने सिटी लिंकला दिले आहे. शहरात रस्त्यांवर फिरणाऱ्या या बेघरांना तेथे निवाऱ्याची सोय केली जाणार आहे. महापालिकेच्या निवारा केंद्रामुळे उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व निराधारांना आधार ठरणार आहे.

शहरात रामकुंडासह विविध धार्मिक ठिकाण, तसेच विविध सिग्नल, मंदिर परिसर, उद्यान, मुख्य बाजारात बेघरांची मोठ्या प्रमाणात भटकंती असते. अशा बेघर व्यक्तींसाठी पंडित दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत बेघरांना निवाऱ्याची व्यवस्था केली जाते. शहरात अजून चार निवारा केंद्र होणार असून, त्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. लवकरच त्यास मंजुरी मिळणार आहे. तपोवन येथील निवारा केंद्र दोन मजली असून, तेथे २८० व्यक्ती एकावेळी राहू शकतात. त्यांना दोन वेळचे जेवण, नाष्टा दिला जातो. केवळ निवारा न देता त्यांच्यात उमेद निर्माण करणे, स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, हादेखील निवारा केंद्राचा उद्देश आहे.

हेही वाचा: SSC Result : योगायोग की चमत्कार? जुळ्या बहिणींना मार्क देखील सेम टू सेम

२२ कोटीचे नियोजन

नाशिक शहरात २०१९ मध्ये व्ही मॅक्स संस्थेने शहरात बेघर व्यक्तींचा सर्व्हे केला होता. त्या वेळी त्यांना ८९४ बेघर आढळून आले होते. महापालिकेने चेहेडी पंपिंग, सातपूर परिसरातील महादेववाडी, पंचवटी व वडाळा गाव यथे निवारा केंद्र करण्याचे ठरवले आहे. यासाठी सुमारे २२ कोटींचा खर्च येणार आहे.

हेही वाचा: Nashik : पेन्शन अदालतमध्ये 55 प्रकरणे निकाली

Web Title: Nmc Shelter For Homeless In Tapovan For Monsoon Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top