Latest Marathi News | बेघरांसाठी NMCचे निवारा घर; 894 बेघर लाभार्थ्यांची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC News

बेघरांसाठी NMCचे निवारा घर; 894 बेघर लाभार्थ्यांची नोंद

नाशिक : शहरातील सिग्नल, मुख्य चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात बेघर नागरिक आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने निवारागृहात रवानगी करण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत १७० जणांना निवारागृहात सामावून घेण्यात आले, तर ४५ नागरिकांचे समुपदेशन करून त्यांना घरी सोडण्यात आले. (NMC shelter home for homeless people 894 registered homeless beneficiaries Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: अबब! कोथिंबिरीला मिळाला हजारांत भाव; शेतकरी मालामाल

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बेघरांचे सर्व्हेक्षण करून तातडीने निवारागृहात दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मुंबई नाका, द्वारका तसेच महत्त्वाच्या चौकामधून बेघरांना विविध ठिकाणच्या निवारागृहात दाखल करण्यात आले. तपोवन येथील बेघर निवारा केंद्रात सध्या १०२ लाभार्थी आहे. त्यातील १९ जणांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

संत गाडगे महाराज बेघर निवारा केंद्रात ६८ लाभार्थी असून, त्यातील २६ जणांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. चहा व नाश्त्याच्या सोयी बरोबरच बेघरांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला.

४५ नागरिकांचे समुपदेशन

निवारागृहामध्ये दाखल करण्यात आलेल्या बेघरांपैकी ४५ बेघर नागरिक व त्यांच्या कुटुंबांचे समुपदेशन करून सोडून देण्यात आले. लाभार्थ्यांचे पुनर्वसन करणे, लाभार्थ्यांना कागदी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण केले जाणार असल्याची माहिती उपायुक्त करुणा डहाळे यांनी दिली

हेही वाचा: Nashik : भुजबळांनी MVP संस्थेस दिली 5 लाखांची देणगी

Web Title: Nmc Shelter Home For Homeless People 894 Registered Homeless Beneficiaries Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashiknmcNMC commissioner