NMC News : अडीच हजार बालके व्याधीग्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC

NMC News : अडीच हजार बालके व्याधीग्रस्त

नाशिक : महापालिका हद्दीमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये अडीच हजारहून अधिक बालके विविध व्याधींनी ग्रस्त असल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.

८७८ बालकांना रुग्णालयात पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. महापालिकेकडून जागरूक पालक सुदृढ बालक अभियान राबविले जात आहे. (NMC Two half thousand children affected by disease nashik news)

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

या अभियानाच्या माध्यमातून बालकांचे आजार वेळीच ओळखून त्यावर उपचार करण्यासाठी खासगी शाळा व अंगणवाड्यांमध्ये आरोग्य तपासणी केली जाते. नाशिक महापालिका हद्दीमध्ये पाच लाख मुलांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते.

त्यासाठी ३१३ पथकांची निर्मिती करण्यात आली. या पथकाच्या माध्यमातून २९४ शाळा १९० अंगणवाड्या व ९४ इतर ठिकाणी ९७ हजार ९३ बालकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये २५२४ बालकांना विविध व्याधींनी ग्रासल्याचे आढळून आले.

यातील १६४६ बालकांवर औषध उपचार करण्यात आले. ८७८ बालकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. एका बालकावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.