Nashik News : NMCला हवेत 12 सहाय्यक आयुक्त! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC Latest News

Nashik News : NMCला हवेत 12 सहाय्यक आयुक्त!

नाशिक : राज्य शासनाकडे सादर करावयाच्या सेवा व प्रवेश नियमावलीला महासभेने हिरवा कंदील दाखविल्यानंतर आता जवळपास २८०० पदे भरण्याची प्रतीक्षा प्रशासनाला आहे.

अधिकारी वर्गाच्या एकूण पदांपैकी १२ सहाय्यक आयुक्त, सिटीलिंक कंपनीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर उपसचिव किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी तसेच भूसंपादनासाठी स्वतंत्र उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकाऱ्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. (NMC wants 12 Assistant Commissioners Nashik News)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या झालेल्या बैठकीमध्ये सेवा व प्रवेश नियमावली मंजूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याअनुषंगाने महासभेने सेवा व प्रवेश नियमावली नुकतीच मंजूर केली.

त्यामध्ये महापालिका प्रशासनाकडून पदांचा गोषवारा दिला आहे. त्यामध्ये महापालिकेला वाढती गरज लक्षात घेऊन बारा सहाय्यक आयुक्तांची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर शहर बससेवा अर्थात सिटीलिंक कंपनीसाठी स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

त्यासाठी उपसचिव किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर भूसंपादन विभागासाठीदेखील उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा, असा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashiknmc