NMC Water Supply: शहराची पाणीकपात टळणार! संकट पावसामुळे दूर

NMC water supply
NMC water supplyesakal
Updated on

NMC Water Supply : यंदा ‘अल निनो’ च्या संकटामुळे मॉन्सून आगमन लांबणार या अंदाजामुळे जूनपासून साधारण तीस दिवसांच्या अतिरिक्त पाणीकपातीसाठी प्रयत्नशील असलेल्या प्रशासकीय यंत्रणेला पावसाने दिलासा दिला आहे.

जूनला पावसाने आगमन झालेच नसते तर साधारण ऑगस्टपर्यंत पाणी पुरविण्यासाठी आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीची तयारी प्रशासनाने केली होती. मात्र जूनला पावसाने हजेरी लावून दिलासा दिल्याने शहरावरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. (NMC Water Supply City water shortage will avoided Crisis averted by rain nashik)

पावसाने ओढ दिली असती तर महापालिका प्रशासन जुलैपासून आठवड्यातून एक दिवस पाणीकपात लागू करणार होते. पण मागील आठवड्यात झालेल्या पावसाने गंगापूरसह इतरही अनेक धरणाच्या क्षेत्रात सरासरी शंभर दलघफू पाणीसाठा वाढला आहे.

त्यामुळे महापालिकेने पाणीकपात निर्णय घेणे टाळले आहे. गंगापूर धरणातून नाशिककरांची तहान भागविली जाते. गंगापूरसह दारणा व मुकणे धरण मिळून वर्षभरासाठी नाशिककरांसाठी पाच हजार ८०० दलघफू पाणी पिण्यासाठी आरक्षित असून ३१ जुलैपर्यंत नाशिककरांची तहान भागवली जाते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC water supply
NMC News : बिंदू नामावलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या कोर्टात

पण यंदा ‘अल निनो’ वादळाच्या धसक्यामुळे दरवर्षी उपलब्ध जलसाठा ३१ जुलैऐवजी ऑगस्ट अखेरपर्यंत पुरवण्याची कसरत मनपाला करायची आहे. गंगापूर धरणातून अतिरिक्त दोनशे व दारणातून शंभर असे वाढीव तीनशे दलघफू पाणी मनपाला मिळाले.

य‍ा उपलब्ध पाण्यातून येत्या २० ऑगस्टपर्यंत म्हणजे साधारण पाच ते सहा दिवसांसाठी पाणी तुटवडा कमी झाला. त्यामुळे जुलैपासून आठवड्यातून एकदा पाणीकपात तयारीचे नियोजन होते, ते संकट पावसाने हजेरी लावल्याने दूर झाले आहे.

NMC water supply
Monsoon Tourism : एकावर एक फ्री! या ठिकाणी देवादर्शनासह घेता येईल पावसाळ्याच्या सहलीचा आनंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com