
NMC News : महापालिकेच्या सेवाप्रवेश नियमावलीला मंजुरी मिळाली असून, त्याअनुषंगाने विविध संवर्गातील पदांचा सुधारित आकृतिबंध तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
एकूण संवर्गातील विविध प्रकारच्या १३ संवर्गातील पदांच्या बिंदू नामावलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. (proposal for list of points was submitted to Divisional Commissioner for approval nmc nashik news)
महापालिका ‘क’ संवर्गातून ‘ब’ संवर्गात समाविष्ट करण्यात आली आहे. परंतु ‘ब’ संवर्गात समाविष्ट करताना विविध पदांचा आकृतिबंध अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. जुन्या संवर्गातील पदानुसारच अद्यापही काम सुरू आहे. ‘क’ संवर्गातील आस्थापना परिशिष्टानुसारच ‘ब’ संवर्गात पदे कार्यरत आहे.
पूर्वीचा आस्थापना परिशिष्ट सात हजार ९२ पदांचा आहे. त्यानंतर राज्य शासनाने कोरोना कालावधीमध्ये अग्निशमन व वैद्यकीय विभागातील पदे भरण्यास परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने सद्यःस्थितीत सात हजार ७१७ पदे मंजूर आहेत. निवृत्तीसाठी कारणांमुळे सध्या २८०० पदे रिक्त आहेत. कोविडकाळात राज्य शासनाने परवानगी दिलेल्या अग्निशमन व वैद्यकीय सेवेतील पदांची भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टंट सर्व्हिसेसमार्फत राबविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
रिक्त पदांची भरती करण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला सेवा व प्रवेश नियमावली मंजूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने दोन महिन्यापूर्वी महासभेने मंजुरी दिली. त्याचबरोबर ‘ब’ संवर्गानुसार सुधारित आकृतिबंध मंजुरीसाठी तीन महिन्यांच्या आत सादर करण्याच्यादेखील सूचना दिल्या. प्रशासनाकडून शासनाला आकृतिबंध सादर केला जाणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यापूर्वी बिंदू नामावलीला मंजुरी द्यावयाच्या शिल्लक तेरा संवर्गाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांकडून बिंदू नामावलीला मंजुरी मिळाल्यास भरतीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण पदांपैकी ४४ पदांमध्ये वाढ होईल. महापालिकेतील मंजूर आस्थापना परिशिष्टानुसार २१० संवर्ग आहे. सुधारित आकृती बंध तयार झाल्यानंतर संवर्गांची संख्या वाढणार आहे. तर गंगा पट्टेवाले संवर्ग सफाई कर्मचाऱ्यांमध्ये समाविष्ट होईल , तसेच वॉचमन ही पदेदेखील सुरक्षा रक्षक संवर्गात समाविष्ट होणार आहे.
लोकसेवा आयोगामार्फत डॉक्टर भरती
अग्निशमन व वैद्यकीय संवर्गातील एकूण सातशे चार पदांपैकी ‘ब’ संवर्गातील ५८७ पदे आउट सोर्सिंगच्या माध्यमातून भरली जाणार आहे. त्यासाठी नाशिक महापालिकेकडून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. जुलैच्या अखेरपासून भरती प्रक्रियेला सुरवात होण्याची शक्यता आहे.
मात्र वैद्यकीय विभागातील डॉक्टर या पदासह अन्य काही संवर्गातील एकूण ८४ पदे ही ‘अ’ संवर्गातील असल्याने अशी पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरती केली जाणार आहे. यापूर्वी राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.