Nashik News : NMC स्वनिधीतून तयार करणार पेठ रोड! पावणेदोन कोटी रुपयांच्या कामाचे कार्यारंभ आदेश

Bad condition of Peth Road
Bad condition of Peth Roadesakal

नाशिक : पेठ रोडवरील तवली फाटा ते महापालिका हद्दीपर्यंत जवळपास चार किलोमीटरचा रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात घेता महापालिका प्रशासनाने स्मार्टसिटी कंपनीमार्फत काँक्रीटचा रस्ता तयार करण्याचे नियोजन केले.

मात्र, कंपनीने निधी देण्यास नकार दिल्यानंतर तातडीची बाब म्हणून अखेर स्वनिधीतून रस्त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने अनेक महिन्यांपासून पेठ रोड येथील रहिवाशांचा त्रास संपुष्टात येणार आहे. (NMC will build Peth Road with its own funds Commencement order for work worth 2 crores Nashik News)

पेठकडून नाशिक शहरात प्रवेश करताना राष्ट्रीय महामार्ग ८४८ वरील हॉटेल राऊ ते तवली फाटा या दरम्यान जवळपास चार किलोमीटरच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. जवळपास चार किलोमीटरचा रस्ता पार करताना वीस ते पंचवीस मिनिटांचा कालावधी लागतो.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांचे नुकसान तर होतेच. त्याशिवाय येथून कायम प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना शारीरीक आजारांना सामोरे जावे लागते. धुळीमुळे या परिसरातील घरे कुलूपबंद होत आहे. दम्याचे त्रास नागरिकांना सहन करावे लागत आहे.

सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले असले तरी निधीची कमतरता भासत आहे. त्यामुळे स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून रस्ता करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. त्यासाठी ७१ कोटींचा खर्च स्मार्टसिटी कंपनीने द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.

परंतु, स्थानिक माजी नगरसेवक अरुण पवार यांनी रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधत तातडीने दुरुस्त करण्याची मागणी महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली होती. त्याच दरम्यान जोपर्यंत रस्ता होत नाही, तोपर्यंत महापालिकेच्या माध्यमातून या भागात दररोज दोन याप्रमाणे धुळीच्या रस्त्यावर टँकरद्वारे पाण्याची फवारणी केली जाते

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Bad condition of Peth Road
Scholarship Exam : राज्यातील 9 लाख विद्यार्थ्यांची रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा

स्मार्टसिटी कंपनीचा नकार

स्मार्टसिटी कंपनीची मार्च २०२३ मध्ये मुदत संपुष्टात येत असली तरी केंद्र सरकारने स्मार्टसिटी कंपनीचे कार्यालय तसेच ठेवून त्या माध्यमातून सर्वेक्षण व सल्लागार संस्था म्हणून कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यामुळे भविष्यात प्रकल्प सोबतच इतर कामासाठी निधीची आवश्यकता भासणार असल्याने स्मार्टसिटी कंपनीने ७१ कोटी रुपये खर्च करून चार किलोमीटर रस्ता काँक्रिटीकरणाला नकार दिला आहे. त्यामुळे स्वनिधीतून रस्ता दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.

Bad condition of Peth Road
Nutrition Allowance Increase : शाळांमधील स्वयंपाकीच्या मानधनात 1 हजाराची वाढ!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com