NMC करणार 1 लाख वृक्षांचे रोपण | nmc Latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC latest marathi news

NMC करणार 1 लाख वृक्षांचे रोपण

नाशिक : स्वच्छ व हरित नाशिकचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महापालिकेकडून (NMC) यंदा एक लाख वृक्षारोपण (Tree Plantation) केले जाणार आहे. यात गोदावरी नदीच्या किनारी आनंदवली विभागात २००० वृक्षांची लागवड केली जाणार आहे.

पिंपळ, पेरू, चिंच या देशी रोपांची लागवड केली जाणार आहे. सद्यःस्थितीमध्ये सामाजिक दायित्वाच्या निधीतून ५०००० वृक्षारोपणाचे काम सुरू आहे. (NMC will plant 1 lakh trees nmc latest marathi news)

२०२२- २३ या वन महोत्सवांतर्गत पांडव लेणी परिसरातील दादासाहेब फाळके स्मारक, बुद्धविहार येथे इंडियन ऑइल कार्पोरेशन व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने पिंपळ, वड, कदंब, चिंच व अर्जुन सादडा या देशी प्रजातींच्या एकूण १५०२ वृक्षांची लागवड करण्यात आली.

उपयुक्त विजयकुमार मुंडे, सिडकोचे विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे श्री. कुमार, व्यवस्थापक हेमलता नागदेव, जी. एस. पी. सिंग आदी उपस्थित होते. भारत पेट्रोलियम कंपनीनेदेखील वृक्षारोपण करण्याची तयारी दाखवली असून, महापालिकेकडे जागेची मागणी केली आहे.

हेही वाचा: गोदाकाठावरील पिकांची मोठी हानी; त्वरित पंचनामे करत नुकसानभरपाईची मागणी

सह्याद्री देवराईचा वाटा

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेकडून विविध जातींची दोन हजार रुपये उपलब्ध करून दिली जाणार आहे. वृक्षारोपण मोहिमेत शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, महापालिकेचे सहा विभागीय कार्यालय आदी भागात वृक्षारोपण केले जाणार आहे.

हेही वाचा: अतिवृष्टीमुळे नाशिक विभागाच्‍या 60 बसफेऱ्या झाल्‍या रद्द

Web Title: Nmc Will Plant 1 Lakh Trees Nmc Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashiknmcTree Plantation
go to top