esakal | नाशिक : कालिकामाता मंदिरात टोकणशिवाय दर्शन नाही
sakal

बोलून बातमी शोधा

kalika

नाशिक : कालिकामाता मंदिरात टोकणशिवाय दर्शन नाही

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : कालिका यात्रोत्सवनिमित्त मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना टोकणशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे सर्वांना टोकन देणे शक्य नसल्याने विश्वास्तांकडून ऑनलाइन दर्शनाची सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. घरबसल्या भाविक दर्शन घेऊ शकणार आहे , अशी माहिती पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांच्याकडून देण्यात आली.

पोलिस उपायुक्त तांबे ; ऑनलाइन दर्शनाची सुविधा

गुरुवार (ता.७) पासून नवरात्रोत्सवास सुरवात होणार आहे. यानिमित्त दरवर्षी कालिकामाता मंदिरात यात्रेचे आयोजन केले जाते. कोरोना प्रादुर्भाव असल्याने यंदादेखील यात्रा रद्द केली आहे. परंतु, धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे भाविकांची दर्शनासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. असे होऊ नये, यासाठी मंदिर विश्वस्तांकडून नियोजन करण्यात यावे. यासाठी कालिका मंदिर विश्वस्त आणि पोलिस विभागाकडून बैठक घेण्यात आली. मंदिरात गर्दी टाळण्यासाठी टोकण पद्धतीचा अवलंब करावा, तासाभरासाठी केवळ ६० भाविकांना टोकन द्यावे, थर्मल स्क्रीनिंग यासह कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना तांबे यांनी या वेळी दिल्या. ऑनलाइन नोंदणी करत भाविकांना टोकन उपलब्ध होणार आहे. याशिवाय ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी न करता उत्सव साजरा करावा, अशा सूचनादेखील करण्यात आल्या. दरम्यान, मंदिरातील दैनंदिन पूजाविधी ५ भाविकांच्या उपस्थितीत नित्यनियमाने होणार आहे.

हेही वाचा: Nashik : तिसऱ्या लाटेसाठी दोन लाख ॲन्टिजेन किट खरेदी

कालिकामाता मंदिरात टोकणशिवाय दर्शन नाही

ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करत टोकन प्राप्त करून घ्यावेत, सर्वांनाच टोकन देणे शक्य नसल्याने त्यांच्यासाठी ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशवअण्णा पाटील यांच्याकडून करण्यात आले. या वेळी सहाय्यक आयुक्त दिपाली खन्ना, वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख, वीज वितरण विभागाचे राजेश श्रीनाथ, पश्चिम विभागीय अधिकारी श्री हरिश्चंद्र, अग्निशमन विभागाचे श्‍याम राऊत, राजू गायकवाड यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: नाशिकच्या ‘ वायनरी स्ट्रीट’ची उडाली त्रेधातिरपीट

loading image
go to top