
दोन दिवसांपासून वीजपुरवठा नाही; उकाड्याने नागरीक त्रस्त | Nashik
दरेगाव (जि. नाशिक) : चांदवड तालुक्यातील दरेगाव परीसरात दोन दिवसांपासून वीजपुरवठा (Electricity) नसल्यामुळे रात्रीच्या वेळी उकाड्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरीकांवर रात्रभर जागरण करण्याची नामुष्की ओढवली आहे.
हेही वाचा: आयुक्तांकडून फाळके स्मारक सुरू करण्याच्या सूचना | Nashik
सबस्टेशनला फोन केला असता भारनियमन वाढल्याने वीजपुरवठा बंद करण्यात आल्याचे कारण पुढे केले जात आहे. भारनियमन कशाबद्दल आहे, हेदेखील कर्मचारी व महावितरण विभागाच्या (MSEDCL) कार्यकारी अभियंत्यांना माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भारनियमन किती वेळ आहे व कधी वीजपुरवठा सुरू होईल, याची माहिती कर्मचाऱ्यांना नसते. उन्हाळ्यात विहीरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे विद्युतपंप अत्यंत कमी वेळ सुरू असतात. असे असतानाही भारनियमन का, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहे.
हेही वाचा: चैत्रोत्सवासाठी सप्तशृंगगड सज्ज; यंदा विक्रमी गर्दीची शक्यता
Web Title: No Power Supply From Two Days Civilians Are In Trouble Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..