Nashik : मानूर, आश्रम पाडा परिसरात मोबाईल नेटवर्क रेंजचा बोजवारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BSNL No range

Nashik : मानूर, आश्रम पाडा परिसरात मोबाईल नेटवर्क रेंजचा बोजवारा

साल्हेर (जि. नाशिक) : बागलाण पश्‍चिम आदिवासी (Tribal Area) पट्ट्यातील मानूर, आश्र पाडा, बिंद्रावन, गडीपाडा, मोराळा, उडीपाडा, जामुसोडापाडा, टाकळी पाडा, भोकरपाडा, देवळीपाडा, खैराड ही गावे मानूर ग्रामपंचायत अंतर्गत आहे. याठिकाणी बीएसएनएल (BSNL) टॉवरला रेंज (Tower Range) नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. आदिवासी नागरीकांना अक्षरश: डोंगरावर जाऊन नेटवर्क (Network) शोधावे लागत आहे. या भागातील नेटवर्क सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा क्रांतीकारी आदिवासी युवा प्रतिष्ठान ग्रुपचे बागलाण तालुकाध्यक्ष मयूर भोये यांनी इशारा दिला आहे. (No range for mobile network in manuri ashram Pada area Nashik News)

महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर असलेला मानूर हा भाग पूर्ण आदिवासी असल्याने या भागाकडे सर्वच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. मानूर हे कळवण व बागलाण तालुक्याच्या सीमेवर गाव आहे. या भागात बीएसएनएल मोबाईलच्या टॉवर व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच कंपनीचा टॉवर नसल्याने नेटवर्क मिळत नाही. काही अंतरावरच शिरसा (ता. कळवण) व साल्हेर (ता. बागलाण), तसेच सीमेवर गुजरात हद्द असलेल्या ठिकाणीही जिओ कंपनीचा टावर आहे. मात्र, डोंगराळ भाग असल्यामुळे या गावांच्या जिओ टॉवरचे मोबाईल नेटवर्क मानूरपर्यंत पोहोचत नाही. नेटवर्क नसल्यामुळे शेतकऱ्यांची ऑनलाइनची कामे होत नाही. त्यामुळे या भागातील आदिवासी शेतकरी मेटाकुटीला आला आहे. संबंधित विभागाने तत्काळ सुविधा देण्यात यावी, अशी मागणी क्रांतीकारी आदिवासी युवा प्रतिष्ठान ग्रुपचे तालुकाध्यक्ष मयूर भोये यांनी केली आहे.

हेही वाचा: नाशिक : दिंडोरीत सातव्या जिल्हा परिषद गटाची निर्मिती

"बागलाण तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या मानूर भागात आदिवासी बांधव असून, या भागाकडे सर्वच लोकप्रतिनिधींनी डोळेझाक केलेली आहे. बीएसएनएलचे मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने शेतकऱ्यांची ऑनलाइन काम ठप्प झालेली आहे. त्यामुळे बीएसएनएल तत्काळ या भागातील मोबाईल नेटवर्क सुरळीत करण्यात यावा."

- मयुर भोये, तालुकाध्यक्ष, क्रांतिकारी आदिवासी प्रतिष्ठान, ग्रुप

हेही वाचा: Nashik : पोलिस चौकी बंदमुळे नागरिकांची पायपीट

Web Title: No Range For Mobile Network In Manuri Ashram Pada Area Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top