Nashik : पोलिस चौकी बंदमुळे नागरिकांची पायपीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Upanagar Police Station Closed

Nashik : पोलिस चौकी बंदमुळे नागरिकांची पायपीट

नाशिक रोड : उपनगर नाक्यावर असणारी पोलिस चौकी (Police Station) कायमस्वरूपी बंद (Closed) असते. तक्रार करायला लोकांना उपनगर पोलिस स्टेशनला यावे लागते. यामुळे लोकांची पायपीट होते. त्यामुळे पोलिस चौकी चोवीस तास उघडे ठेवून लोकांची पायपीट थांबवावी, अशी मागणी होत आहे. याआधी अनेक वेळा आंदोलने झाली, निवेदने देण्यात आली, मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला नसल्याचे नागरिक सांगत आहे. (upnagar police station is closed Nashik News)

गेल्या आठ वर्षापासून अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, नागरिक यांनी उपनगर नाक्यावर हाकेच्या अंतरावर असणारी ही पोलिस चौकी कायमस्वरूपी २४ तास उघडी ठेवावी म्हणून आंदोलनेही केली आहे. मात्र, त्याचा तात्पुरता प्रभाव दिसून आला. उपनगर नाक्यावर असणारी पोलिस चौकी कार्यान्वित झाल्यास गुन्हेगारांवर वचक बसू शकतो. याशिवाय नाशिक- पुणे रोडवर होणारे अपघात, सोनसाखळ्या चोरीचे प्रकार यांनाही आळा बसू शकतो. त्यामुळे ही चौकी कार्यान्वित करणे काळाची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहेत. ही चौकी २४ तास कार्यान्वित करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघटनांबरोबरच काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते लवकरच पोलिस आयुक्तांना निवेदन देणार आहेत.

हेही वाचा: नाशिक : दिंडोरीत सातव्या जिल्हा परिषद गटाची निर्मिती

"उपनगर पोलिस चौकी २४ तास उघडे राहिल्यास रस्त्यावर होणाऱ्या अपघातांना मदत मिळेल. शिवाय गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल. या ठिकाणी २४ तास एक कर्मचारी राहिल्यास लोकांचा नेहरूनगर येथील पोलिस स्टेशनचा चक्कर कमी होईल. म्हणून ही चौकी कायमस्वरूपी उघडी राहायला हवी." - वैशाली दाणी.

हेही वाचा: 1 जून सार्वजनिक वाढदिवसदिनी ग्रामीण भागात केकची विक्रमी विक्री

Web Title: Upnagar Police Station Is Closed Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikPolice Station
go to top