Non veg Food in Winter : वाढत्या थंडीमुळे नॉनव्हेजचा बाजार तेजीत; ग्रामीण भागात पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Non veg dish

Non veg Food in Winter : वाढत्या थंडीमुळे नॉनव्हेजचा बाजार तेजीत; ग्रामीण भागात पसंती

येसगाव (जि. नाशिक) : हिवाळा सुरु झाल आहे. दिवसेंदिवस थंडी वाढत आहे. या वाढत्या थंडीबरोबरच खवैय्यांनी आहारात मांसाहाराचा समावेश वाढवल्याने नॉनव्हेजच्या पदार्थांनी बाजार चांगलाच तेजीत येऊ लागला आहे.

हिवाळ्याच्या दिवसात जास्त उष्मांक देणारे व पौष्टिक खाद्य असलेल्या पदार्थ जेवणात यावे म्हणून मांसाहारी शौकीन व अन्य लोक मांसाहाराचे प्रमाण वाढवतात. यामुळे बाजारात अंडी, बोंबील, चिकन, मासे, मटण आदी मांसाहारी वस्तू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. (Non veg market booming due to growing cold Preference in rural areas winter nashik news)

थंडीत अंडी महाग होतात. अंड्यात प्रोटिन्स व इतर घटक असल्यामुळे सर्वसामान्यांपासून खाण्यात अंड्याचा वापर करतात. नॉनव्हेजच्या पदार्थांची मागणी वाढल्यामुळे बाजारात दरवाढ झालेली आहे. सध्या ग्रामीण भागात गावोगावी शेतीकामांना वेग आलेला आहे. त्यामुळे तेथे बाहेरील मजुरांचे प्रमाण वाढले आहे.

स्थानिक किंवा परिसरातील बाजारात मजूर वर्ग मांसाहारापेक्षा अंडी, बोंबील, सुकट, सोडे आदी साठवता येणारे पदार्थही आठवडाभर पुरतील इतके खरेदी करतात. रोजच्या जेवणातही त्यांचा समावेश वाढवला जातो. धार्मिक दिवस, उपवास या व्यतिरिक्त उर्वरीत दिवशी आवर्जून मांसाहारी मंडळी बाजारात खरेदी करताना दिसत आहे. रात्रीच्या वेळी अंडा- पावच्या गाड्यांवरही गर्दी दिसू लागली आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Nashik News : सत्र पूर्ण करण्याची हुकणार Deadline!; अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्‍हान

सरासरी भाव (होलसेल)

- अंडी एक डझन : ७२ रुपये

- ३० अंड्याचे कॅरेट : १४० रुपयेहेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

- गावराण अंडी : १० रुपये नग

- बोंबील : ६४० रुपये किलो

- सोडे : २००० रुपये किलो

- सुकट : ४८० रुपये किलो

- बॉयलर चिकन : १८० रुपये किलो

- कॉकरेल : ४०० रुपये किलो

- गावरान कोंबडी : ६०० रुपये किलो

- बोकडाचे मटण : ६०० रुपये किलो

हेही वाचा: Nashik News : कसमादे भागात ‘कांदा एके कांदा’; 50 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचा अंदाज

टॅग्स :NashikWinterNon veg food