North Maharashtra Kesari
sakal
इंदिरानगर: पाथर्डी येथे २२ आणि २३ नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेअंतर्गत राजे छत्रपती उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून, दुपारी चारला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. रविवारी सायंकाळी सातला क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ होणार असल्याची माहिती स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आणि माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांनी दिली आहे.