Chetan Repale
sakal
इंदिरानगर: पाथर्डी येथे झालेल्या उत्तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अंतर्गत राजे छत्रपती उत्तर महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत अहिल्यानगर येथील चेतन रेपाळे उत्तर महाराष्ट्र केसरी ठरला. त्याला रोख ५१ हजार रुपये आणि अंबादास कालेकर यांच्यातर्फे चांदीची गदा देऊन ग्रामस्थांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर धुळे येथील ऋतिक राजपूत उपविजेता ठरला. अहिल्यानगर संघाने धुळ्याच्या ऋतिकचा ५-० असा पराभव केला.