Omicron | ATM मधून सॅनिटायझर गायब; Corona नियमांची पायमल्ली

 atm center
atm centeresakal
Updated on

मनमाड (जि. नाशिक) : कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचे संकट कमी झाल्याने सर्वांनीच नि:श्‍वास सोडला आहे. कोरोना नियमावलींचे पालन आणि मास्क, सॅनिटायझरचा वापर जवळजवळ बंद झाला आहे. मात्र, ‘ओमिक्रॉन’च्या (Omicron) पार्श्‍वभूमीवर नागरिक अद्यापही काळजी घेताना दिसत नाही. विशेषतः पैसे काढण्यास गेले असता स्क्रीन आणि बटनाच्या माध्यमातून संसर्ग वाढू शकतो. शहरातील प्रत्येक एटीएम (ATM) सेंटरची हीच अवस्था आहे.

प्रशासन अद्यापही ॲक्शनमोडवर नाही

कोरोची दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर आता काही होणार नाही, घाबरण्याचे काही कारण नाही असे म्हणत प्रत्येकाने कोरोना नियम पाळण्याचे टाळले आहे. मात्र, काही दिवसांपासून ओमिक्रॉनने डोके वर काढल्यामुळे सर्वांचेच धाबे दणाणले आहे. शासनाने प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. मात्र, अद्यापही प्रशासन ॲक्शनमोडवर येताना दिसत नाही. मास्क लावा सांगण्यासाठी कर्मचारी उपस्थित नसतो. त्यामुळे एटीएम सेंटरमध्ये संसर्गाचा धोका वाढला आहे.

 atm center
मिक्स लसीच्या डोसमुळे ओमिक्रॉनचा धोका टळेल? एका स्टडीतून खुलासा

''शहरातील कोणत्याच एटीएम सेंटरमध्ये कोरोनाचे नियम दिसून येत नाही. कुठेच सॅनिटायझर दिसत नाही. तर कोरोना नियमाबाबत ग्राहकांना विचारणा करण्यासाठी कर्मचारी नाही. यासाठी शहरातील सर्वच एटीएम सेंटरमध्ये सॅनिटायझरची व्यवस्था आणि कर्मचाऱ्याची नेमणूक करावी.'' - सचिन गरुड, ग्राहक

 atm center
कोरोनाने मृत्यू झालाय, पण कागदपत्रे नाहीत; शासनाचे महत्वाचे पाऊल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com