NMCच्या वैद्यकीय विभागाला नोटीस; कामगिरी असमाधानकारक असल्याचे ताशेरे | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC Latest marathi news

NMCच्या वैद्यकीय विभागाला नोटीस; कामगिरी असमाधानकारक असल्याचे ताशेरे

नाशिक : मलेरियाच्या पॅसिव्ह सर्वेक्षणात महापालिकेची कामगिरी असमाधानकारक असल्याचे ताशेरे ओढत जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला नोटीस बजावली आहे.

कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांचे थाप सदृश आजाराच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याचा मासिक अहवाल जिल्हा हिवताप अधिकारी यांना सादर करणे बंधनकारक आहे. यासाठी मलेरियाच्या पॅसिव्ह सर्वेक्षण केले जाते. (Notice to Medical Department of NMC Performance is found to be unsatisfactory Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik : मनोरुग्ण महिलेने पेटवून घेतले

एकूण रुग्णांपैकी किमान १५ टक्के रुग्णांचे रक्त नमुने घेऊन तपासणी करावी, असा नियम आहे. परंतु, जून महिन्यात वैद्यकीय विभागाने पॅसिव्ह सर्वेक्षणाची जबाबदारी पाळली नसल्याचे ताशेरे ओढण्यात आले आहे.

महापालिकेच्या एकूण नऊ रुग्णालय व दवाखान्यांमध्ये ७. ४४ टक्के रक्ताचे नमुने घेण्यात आले. नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात १२, ३४६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील फक्त २०२, तर मोरवाडीच्या स्वामी समर्थ रुग्णालयात पाच हजार साठपैकी ८८ रक्त नमुने घेण्यात आले.

पंचवटीतील मायको प्रसूतीगृहात ३४१ पैकी १५२, नांदूर येथील ३६५ पैकी २६, तर जिजामाता रुग्णालयात ११७३ पैकी ९०, उपनगर प्रसूतीगृहात १४२० पैकी ११९, तर गंगापूर रुग्णालयात ७४५ पैकी ७४ नमुने घेण्यात आले.

दसक- पंचक प्रसूतीगृहात १६८७ पैकी १९२ व इंदिरा गांधी रुग्णालयात २९७२ पैकी ४२१ रक्त नमुने घेण्यात आले. रक्त नमुने घेण्याचे प्रमाण कमी असल्याने वैद्यकीय विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले. जुलै महिन्यात या संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे.

हेही वाचा: महिला कामगारांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य : अंजली आडे

Web Title: Notice To Medical Department Of Nmc Performance Is Found To Be Unsatisfactory Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..