नाशिक- जेलरोड परिसरात मागील भांडणाच्या किरकोळ कारणावरून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दोन तडीपार सराईत मित्रांमध्ये झालेल्या वादात एकाने दुसऱ्यावर धारदार हत्याराने हल्ला केल्याने हल्ल्यात एकचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. गुरुवारी (ता.१) रात्री अकराला जेलरोड परिसरातील मोरे मळा बालाजी नगर येथे ही घटना घडली. या घटनेमुळे नाशिक रोडच्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. घटनेनंतर संशयित स्वतःहून पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला आहे.