फार्मसी अभ्यासक्रमांवर आता केवळ "पीसीआय'चे नियंत्रण!...सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

pharmacy.jpg
pharmacy.jpg
Updated on

नाशिक : अनेक वर्षांपासून देशभरातील औषधनिर्माणशास्त्राशी निगडित अभ्यास क्रमांवर फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) या दोन्हींचे नियंत्रण होते. यासंदर्भात एआयसीटीई अंतर्गत औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम वगळण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. त्यामुळे फार्मसी अभ्यासक्रमांवर आता केवळ "पीसीआय'चे नियंत्रण असणार आहे. 

औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांवर फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे नियंत्रण

फार्मसी अभ्यासक्रमांना व इन्स्टिट्यूटला मान्यता "पीसीआय'कडे असेल. एमबीबीएस सारख्या अभ्यासक्रमावर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, तर दंतशाखेतील अभ्यास क्रमांवर डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाचे नियंत्रण असते. त्याचप्रमाणे औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमांवर फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांचे नियंत्रण होते. मात्र, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) ची स्थापना झाल्यानंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रम या आस्थापनेच्या अखत्यारीत आलेत. यात औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमांचाही समावेश होता. तेव्हापासून औषधनिर्माणशास्त्र महाविद्याल यांना एआयसीटीई आणि पीसीआय या दोन्हींच्या निकषांची पूर्तता करावी लागत होती. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत फार्मसी ऍक्‍ट 1948 अन्वये औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांवर फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे नियंत्रण असल्याचे नमूद केले आहे. तंत्रशिक्षण या संकल्पनेतून खंडपीठाने फार्मसी हा शब्द वगळण्याच्या सूचना दिल्या आहेत. तत्पूर्वी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग आणि मनुष्यबळ संसाधन विभाग यांच्या संयुक्‍त बैठकीतही एकच संस्थेचे नियंत्रण असण्यासंदर्भात चर्चा झाली होती. 

महाविद्यालयांना मिळेल दिलासा 

या निर्णयामुळे महाविद्यालयांना आता दोन्ही संस्थांचे निकष पूर्ण करावे लागणार नाहीत. यापूर्वीपर्यंत महाविद्यालयांना या दोन्ही संस्थांनी आखून दिलेल्या निकषांचे, अटी- शर्तींचे पालन करावे लागायचे. त्यामुळे महाविद्यालयांना मान्यता व अन्य गोष्टींची प्रक्रिया सुलभ होणार आहे. पर्यायाने विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा फायदा होईल. 

फार्मसी अभ्यासक्रम, महाविद्यालयांच्या कार्यप्रणाली सुलभ होण्यास मदत होणार आहे. आता फार्मसी अभ्यासक्रमांवर फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे नियंत्रण राहणार असल्याने त्यांच्याकडून "एआयसीटीई'मार्फत उपलब्ध योजना तशाच पुढे सुरू ठेवाव्यात. फॅकल्टीला ग्रॅंड, शिक्षकांचे अभ्यास दौरे, लॅबरोटरीकरिता उपकरणे खरेदीसाठी अनुदान आदी बाबींसंदर्भात "पीसीआय'चे पाठबळ मिळणे अपेक्षित आहे आणि ते मिळेल, असा विश्‍वास आहे. - प्राचार्य डॉ. राजेंद्र भांबर, अध्यक्ष, अभ्यास मंडळ (फार्मसी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

tribal youth protest outside commissionerate Nashik
Shalarth ID Scam
School Education Minister Dadaji Bhuse during the meeting on the pending Satana–Mangrul National Highway project.
Nashik Earthquake
Marathi News Esakal
www.esakal.com