NPS Event
sakal
नाशिक: सरकारी कामातून असो की घरगृहस्थीतून; निवृत्ती ही प्रत्येकाच्या आयुष्यात येते. या काळात नोकरी किंवा नियमित उत्पन्न नसल्यामुळे आर्थिक सुरक्षिततेची गरज सर्वाधिक भासते. त्यामुळे निवृत्तीपूर्व नियोजन आणि बचत, ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना निवृत्ती नियोजनाचे (रिटायरमेंट प्लॅन) महत्त्व समजून देण्यासाठी ‘राष्ट्रीय पेन्शन योजने’ विषयी (एनपीएस) सविस्तर माहितीपर मार्गदर्शन कार्यक्रम गुरुवारी (ता. १३) दुपारी साडेचारपासून कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा संकुलातील पलाश सभागृहात आयोजित केला आहे.