नाशिक- नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेतलेल्या यूजीसी-नेट परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. २१) सायंकाळी जाहीर झाला आहे. या परीक्षेत राष्ट्रीय पातळीवर जेआरएफ व सहायक प्राध्यापक या पदासाठी पाच हजार २६९ उमेदवार, तर सहायक प्राध्यापक व पीएच.डी. प्रवेशासाठी ५४ हजार ८८३, तर पीएच.डी. प्रवेशासाठी एक लाख २८ हजार १७९ परीक्षार्थी पात्र ठरले आहेत.