Tribal Nucleus Budget Scheme : न्यूक्लिअस बजेटच्या योजनांना कात्री; निधी इतरत्र वळविला

Nucleus Budget Yojana
Nucleus Budget Yojanaesakal

Tribal Nucleus Budget Scheme : आदिवासी विकास विभागांतर्गत सर्वसामान्य जनतेच्या न्यूक्लियस बजेट (केंद्रवर्ती अर्थसंकल्प) योजनांना कात्री लागल्याने दुर्बल आदिवासींना यावर्षी कोणतीही योजना मिळणार नसल्याचे समोर आले आहे. (nucleus budget yojana Diversion of tribal development funds for schemes of other departments nashik news)

आदिवासी आयुक्तांनी या योजनांची सखोल चौकशी सुरु करून विविध योजनांना मंजुरी द्यावी. त्यांच्या याद्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथे तात्काळ प्रकाशित करून आदिवासी गरजू लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ डीबीटीद्वारे देण्यात यावेत, अशी मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे.

आदिवासी विकास विभागातील प्रकल्प कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या न्यूक्लियस बजेट (केंद्रवर्ती अर्थसंकल्प) योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात अनागोंदी सुरु आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी आदिवासींचा विकास निधी शासनस्तरावर इतर विभागाच्या योजनांसाठी वळवण्याचा प्रकार राज्यात सुरु आहे. यावर्षी देखील असाच प्रकार झाला, त्याचा फटका आदिवासी योजनांना बसला आहे.

याबाबतचे निवेदन आदिवासी विकास व सुरक्षा असोसिएशनतर्फे राज्यपाल, मुख्यमंत्री, आदिवासी मंत्री व आदिवासी आयुक्त यांना देण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nucleus Budget Yojana
Nashik ZP News : डॉ. सुधाकर मोरे जि. प. चे नवे आरोग्य अधिकारी; चाटेंची बदली

आदिवासी सेवक रवींद्र उमाकांत तळपे, निवृत्त सनदी अधिकारी एकनाथ भोये व हेमंत चौधरी यांनी हे निवेदन आदिवासी आयुक्तांना दिले.

आदिवासींच्या विकासासाठी असलेला इतर योजनांसाठी खर्च करता येणार नाही असा नियम असतानाही तो निधी दरवर्षी इतरत्र वळविला जातो. विभागाच्या कर्मचा-यांच्या पगारावर विकास निधीतून खर्च करता येत नसतानाही तो होतो आहे.

दुर्बल आदिवासींकडून विकास योजनांसाठी अर्ज मागवायचे आणि निधी नाही म्हणून योजना बासनात गुंडाळायची हे अतिशय दुर्देवी आहे. आदिवासींच्या निधीवर अशाप्रकारे शासन वर्षानुवर्षे डल्ला मारत आहे. अशावेळी दुर्बल घटकाने दाद कोणाकडे मागायची हे मोठे आव्हान आहे, असे आदिवासी सेवक रवींद्र तळपे यांनी सांगितले.

Nucleus Budget Yojana
NMC School News : बांधकाम विभागाचा शाळा दुरुस्तीकडे काणाडोळा; महापालिकेच्या 30 शाळा नादुरुस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com