Nashik ZP News : डॉ. सुधाकर मोरे जि. प. चे नवे आरोग्य अधिकारी; चाटेंची बदली

Zilla Parishad nashik
Zilla Parishad nashikesakal
Updated on

Nashik ZP News : जिल्हा परिषदेला अखेर जिल्हा आरोग्य अधिकारी मिळाले असून, सात महिन्यांपासून रिक्त असलेल्या या जागी रायगडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांची नियुक्ती झाली आहे.

डॉ. मोरे सोमवारी (ता.१० पदभार स्वीकारतील. महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे यांची बदली झाली आहे. (zp new health officer is dr sudhakar more nashik)

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांची १४ नोव्हेंबर २२ ला आरोग्य उपसंचालकपदी पदोन्नती झाली. डॉ. आहेर यांच्या बदलीनंतर या पदावर कोणाचाही नियुक्ती झाली नव्हती. त्यांचा पदभार हा डॉ. हर्षल नेहेते यांच्याकडे देण्यात आला होता. या पदावर डॉ. मोरे यांची नियुक्ती निश्चित मानली जात होती.

महिनाभरापासून जिल्हा परिषदेत तशी चर्चा होती. आरोग्य कर्मचाऱ्यांनी तर, त्यांच्या स्वागताचे होर्डिंगही तयार करून ठेवले होते. डॉ. मोरे यांच्या केवळ आदेशाची प्रतीक्षा होती. अखेर त्यांच्या नियुक्तीचे आदेश प्राप्त झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Zilla Parishad nashik
Nashik Rain Alert : नाशिक जिल्हयात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी

आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्राचे प्राचार्य डॉ. सुशीलकुमार वाकचौरे यांची नंदुरबार येथे सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) या पदावर बदली झाली आहे. नंदुरबार येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद पंडित चौधरी हे नाशिकमधील प्राचार्य आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रात बदलून आले आहेत.

महिला व बालकल्याण विभागातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे यांची धुळे शहर बाल विकास प्रकल्प अधिकारीपदी बदली झाली आहे. श्री. चाटे यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला होता. त्यांच्या बदलीची प्रतीक्षा होती. त्यांच्या रिक्त जागी अद्याप कोणाचेही नियुक्तीचे आदेश प्राप्त झालेले नाही.

चाटे यांचा पदभार उमराळे (ता. दिंडोरी) येथील बालविकास प्रकल्प अधिकारी राकेश कोकणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षण विभागातील रिक्त उपशिक्षणाधिकारीपदी पेठचे गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांची पदोन्नतीने बदली झाली आहे.

Zilla Parishad nashik
NMC School News : बांधकाम विभागाचा शाळा दुरुस्तीकडे काणाडोळा; महापालिकेच्या 30 शाळा नादुरुस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com