New Anti-Nuisance Squads for Nashik City Announced : नाशिक शहरातील स्वच्छता आणि अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी माजी सैनिकांच्या सहभागाने उपद्रवविरोधी पथकाची नियुक्ती; दंडात्मक कारवाईचेही अधिकार देण्यात आले.
नाशिक- शहर अतिक्रमणमुक्त करण्याबरोबरच अस्वच्छता करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेकडून विभागनिहाय उपद्रवविरोधी पथकाची नियुक्ती केली जाणार आहे. यात माजी सैनिकांना प्राधान्य दिले जाणार असून, दंडात्मक कारवाईचेदेखील अधिकार दिले जाणार आहेत.