नाशिक : प्रवाशांना भुरळ घालणारा राहुड घाट बनतोय ‘मृत्यूमार्ग’!

number of accidents increased in Rahud Ghat near chandwad on Mumbai-Agra highway
number of accidents increased in Rahud Ghat near chandwad on Mumbai-Agra highway Sakal

चांदवड (जि. नाशिक) : मुंबई - आग्रा महामार्गावरील चांदवडजवळील राहुड घाटाला निसर्गाचे भरभरून देणे लाभल्याने प्रवाशांना भुरळ घालतो. मात्र, हाच राहुड घाट सततच्या अपघातांमुळे वाहनधारकांच्या मनात धडकी भरविणारा ठरला आहे.

राहुड घाटातील म्हसोबा मंदिर ते हनुमान मंदिरदरम्यान नेहमीच अपघात होत असतात. विशेषत: चांदवडकडून मालेगावकडे जाणाऱ्या वाहनांचे अपघात होतात, हे अधोरेखित करण्यासारखे आहे. महामार्गाचे विस्तारीकरण झाल्यानंतर या घाटात अत्यंत प्रशस्त असा रस्ता झाला आहे. राहुड गावाच्या थोडे पुढे निघाल्यानंतर या घाटाला सुरवात होते. हा घाट मालेगावकडे जात असताना राहुड ते चिंचवे गावापर्यंत जवळपास पाच ते सहा किलोमीटरचा उतार आहे. याच कारणांमुळे अनेक वाहनचालक डिझेल वाचविण्यासाठी घाटाच्या सुरवातीला आपले वाहन न्यूट्रल करतात. वाहन न्यूट्रल केल्यामुळे अधिकचा वेग पकडते. अशावेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटतो अन् एकाचवेळी अनेक वाहनांचे अपघात होतात, हे एक प्रमुख कारण असावे. अनेक वाहनचालक नशेत असल्याचेही अपघात झाल्यानंतर स्थानिकांच्या लक्षात आले आहे. तर, अनेक वाहने याठिकाणी वेगमर्यादा ओलांडून दुसऱ्या वाहनांना या तीव्र उताराला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात. या कारणांमुळे येथील महामार्ग ‘मृत्यूमार्ग’ बनला आहे.

number of accidents increased in Rahud Ghat near chandwad on Mumbai-Agra highway
नाशिक : घरच्या घरीच उपचारामुळे लेकीचा मृत्यु, वडिलांविरोधात गुन्हा

अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावे लागले तर काहींना कायमचे अपंगत्वदेखील आले आहे. काहींना आपल्या चुकीमुळे तर काहींना विनाकारण अपघातांना सामोरे जावे लागले आहे. अपघात झाल्यानंतर वाहतूककोंडी ठरलेलीच. त्यामुळे कोंडी सोडविण्यासाठी पोलिस यंत्रणा व सोमा कंपनीलाही यंत्रणेसह दाखल व्हावे लागते.

वेगमर्यादा हाच अपघात रोखण्यावर पर्याय...

अपघात टाळण्यासाठी या घाटात स्पीडब्रेकर बसविलेले आहेत. महामार्गाच्या बाजूला रेलींगची चायना भिंतही बांधलेली आहे. अपघात टाळण्यासाठी यंत्रणा प्रयत्न करतात. मात्र, वाहनचालक डिझेल वाचविण्याच्या नादात तर कधी बेफिकिरीमुळे अपघातांना निमंत्रण देत असतात. याठिकाणी उताराला वाहनचालकांनी आपले वाहन वेगमर्यादेत चालवले तरच अपघात टळतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

number of accidents increased in Rahud Ghat near chandwad on Mumbai-Agra highway
प्रेमासाठी ‘तो' बनला़ बनावट जवान; आर्मी इंटेलिजेंसची कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com