esakal | नगरचा असलेला शेजार तापदायक! येवला, निफाड, सिन्नरची चिंता वाढली | Nashik
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

नगरचा असलेला शेजार तापदायक! येवला, निफाड, सिन्नरची चिंता वाढली

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : जिल्ह्यात कोरोनाचे ५३३ रुग्ण असून, यापैकी एकट्या सिन्नर निफाड व येवल्यात ३४४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे रोजच रुग्ण संख्या वाढत असल्याने या तीन तालुक्यांची चिंता वाढत आहेत. सध्या सर्वाधिक रुग्ण नगर जिल्ह्यात असून या तिन्ही तालुक्यांची सीमा नगरच्या लगत असल्याने हा शेजार तिन्ही तालुक्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शनिवारी (ता.९) येवला व निफाडच्या प्रांताधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र देऊन उपाययोजनेच्या सूचना दिल्या आहेत.


जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. त्यामुळे शाळांसह सर्वकाही सुरळीत झालेले असतानाच पुन्हा एकदा येवला, निफाड व सिन्नर या तालुक्यामध्ये रुग्ण संख्या वाढत आहे. नगर जिल्ह्यात वाढलेला प्रादुर्भाव आणि वेगवेगळ्या कामांसाठी या तालुक्यात व या तालुक्यातून नगर जिल्ह्यात जाण्या- येणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने ही संख्या वाढीस वाढत असल्याच्या निर्णयावर प्रशासन व नागरिक आले आहेत. त्यामुळे नगरमध्ये जाणेही नको अन येणेही नको असा निर्णयाप्रत नागरिक येऊ लागले आहेत.

विशेष म्हणजे तिन्ही तालुक्यांमध्ये शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात रोजच दहा ते वीसच्या दरम्यान रुग्ण निघत असून रुग्णसंख्या देखील शंभरच्या आसपास नियमितपणे राहत असल्याने नागरिकांचीही चिंता वाढली आहे. सध्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ३० पेक्षा कमी रूग्ण असताना निफाड व सिन्नरला सर्वाधिक तर त्याखालोखाल येवल्यात रुग्ण आहेत.

हेही वाचा: नांदगाव : सबवेचा पहिला बळी; रेल्वेखाली सापडून भाविक महिला ठार


जिल्ह्यधिकाऱ्याकडून आपत्कालीन सूचना

नगर जिल्ह्यातून वेगवेगळ्या कामकाजासाठी निफाड, सिन्नर व येवला तालुक्यात ये- जाचे प्रमाण वाढल्याने तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शनिवारी पत्रक काढून निफाड व येवल्याच्या प्रांताधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रवासावर सरसकट बंधने आणणे अव्यावहारिक असल्यामुळे हॉटस्पॉट ठरवून त्याकडे विशेष लक्ष केंद्रित करावे. सर्व विभागाकडून कोरोना प्रतिबंधासाठी सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र घ्यावे. दुकानामध्ये थर्मल गन व पल्स ऑक्सीमीटरद्वारे ग्राहकांची तपासणी करावी. फैलावास वेळीच आळा घालण्याच्या दृष्टीने निफाड, येवला व सिन्नर या तालुक्यातील गृहविलगीकरण पूर्णतः बंद करावे. नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापना व व्यक्ती यांच्या विरुद्ध कारवाई करावी. कृषी उत्पन्न बाजार समित्या, कांदा, टोमॅटो बाजार याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने तेथे गर्दी प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात. उपविभागीय अधिकारी यांनी साप्ताहिक बैठक घ्यावी व दृष्टीने योग्य उपाययोजना तातडीने कराव्यात, अशा सूचना मांढरे यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा: विमा कंपनीच्या नफेखोरीत अन्नदाता बेदखलतालुकानिहाय ॲक्टिव्ह रुग्ण

नाशिक (७०), बागलाण (७), चांदवड (३४), देवळा (९), दिंडोरी (२९), इगतपुरी (३), कळवण (१०), मालेगाव (१०), नांदगाव (१०), निफाड (१३५), पेठ (००), सिन्नर (१३०), सुरगाणा (१), त्र्यंबकेश्वर (६), येवला (७९), नाशिक मनपा (२८६), मालेगाव मनपा (१५), जिल्ह्याबाहेरील (७).

loading image
go to top