फोटो-02394
न्याहारखेडे ः गोरख देवरे यांच्या घरातील अस्ताव्यस्त केलेले सामान.
न्याहारखेडे खुर्दला एकाच रात्रीत तीन चोऱ्या
दागिने, रोकडसह लाखोंचा मुद्देमाल लंपास
सकाळ वृत्तसेवा
नगरसूल, ता. ११ : न्याहारखेडे खुर्द येथे एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडविल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. न्याहारखेडे खुर्द येथील अंगुलगाव रोड परिसरात गोरख देवरे यांच्या घरी गुरुवारी (ता. ८) मध्यरात्री अडीचच्या सुमारास चोरी झाली. देवरे कुटुंबीय झोपलेल्या खोलीच्या दरवाजाला चोरट्यांनी बाहेरून कडी लावून दुसऱ्या खोलीचा दरवाजा तोडून घरातील दागिने, रोकड व मोबाईल लांबविला. यात सात ग्रॅमचे सोन्याचे झुबे, दोन तोळ्यांची सोन्याची पोत, २५ हजारांची रोकड, मोबाईल असा ऐवज चोरीला गेला. दुसऱ्या घटनेत कोळम रोड परिसरातील वयोवृद्ध ठकूबाई भगत घरात झोपलेल्या असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची पोत ओरबाडली. तिसऱ्या घटनेत न्याहारखेडे येथील शेतकरी कैलास देवरे यांच्या शेतातील कांदा चाळीत वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय मजुरांनी चार्जिंगसाठी लावलेले पाच मोबाईल चोरट्यांनी लांबविले. या घटनेत मजुरांचे ७० हजारांचे नुकसान झाले. एकाच रात्रीत तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने न्याहारखेडे खुर्द व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
...........