
Nashik Crime News : त्रिमुर्तीत सव्वालाख नायलॉनचा मांजा साठा जप्त
सिडको (जि. नाशिक) : अंबड पोलिसांनी त्रिमूर्ती चौक येथील सम्राट पतंग विक्री केंद्रावर तपासणी केली असता येथे एक लाख चार हजार आठशे रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. (nylon Manja stock of 1 lakh worth seized in Trimurti Nashik Crime News)
हेही वाचा: Nandurbar News : गटारावरील तुटलेला स्लॅब ठरतोय डोकेदुखी
१५ दिवसांवर संक्रांत हा सण येऊ घातला आहे. या काळात मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्यात येतात. परंतु पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर सिडकोमध्ये मोठ्या प्रमाणात केला जात असल्याचे लक्षात घेऊन अंबड पोलिसांनी संपूर्ण नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे.
या अनुषंगाने आज (ता.२४) पोलिस विभागाला मिळालेल्या गुप्त माहिती नुसार कारवाई करण्यात आली. या कारवाईत संशयित अजिंक्य प्रदीप भिसे (त्रिमूर्ती चौक) व बाळासाहेब खंडेराव राहींज (जेलरोड) यांना ताब्यात घेण्यात आले. कारवाई पोलिस शिपाई प्रशांत नागरे, मुकेश गांगुर्डे, योगेश शिरसाट, प्रवीण राठोड, तुषार देसले, चालक सोनवणे यांनी केली.
हेही वाचा: Nandurbar News : नवापूर साखर कारखान्याचे आज मतदान; उद्या मतमोजणी