अमलीपदार्थमुक्त शहरासाठी शपथ; सायकलिस्ट-शहर पोलिसांची सायकल रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cycle Rally

अमलीपदार्थमुक्त शहरासाठी शपथ; सायकलिस्ट-शहर पोलिसांची सायकल रॅली

नाशिक : आपले शहर, राज्य, देश अमलीपदार्थमुक्त (Drugs Free) करण्याची शपथ घेत सायकलिस्ट असोसिएशन, शहर पोलिस आणि नाशिककरांनी शहरातून पहाटे सायकल रॅली काढली. या सायकल रॅलीने (Cycle Rally) नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. (Oath for a drug free city Cyclist City Police Cycle Rally Nashik News)

जागतिक अमलीपदार्थमुक्त दिनानिमित्त (World Drug Free Day) नाशिक सायकलिस्ट असोसिएशन व नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातर्फे क्लब येथून सायकल रॅली काढण्यात आली. विशेष पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर, मुख्य जिल्हा न्यायाधीश जगमलानी, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, महापालिका आयुक्त रमेश पवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील, सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा: नांदगाव तालुक्यात कृषी संजीवनी मोहिम

शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांनी उपस्थितांना आपले शहर, राज्य, देश अमलीपदार्थमुक्त करण्याची शपथ दिली, तर शहर पोलिसांच्या संकल्पनेतून सायकलिस्ट फाउंडेशनच्या डॉ. मनीषा रौंदळ, डॉ. अजय भन्साळी, साधना दुसाने व त्यांच्या पथकाने ‘मीच माझा वैरी’ हे पथनाट्य सादर केले. त्यानंतर गोल्फ क्लब येथून सायकल रॅलीला प्रारंभ झाला. सायकल रॅलीला पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी झेंडा दाखविला. त्यानंतर रॅली निघून मायको सर्कल, चांडक सर्कल, गडकरी चौक, सीबीएस सिग्नल, अशोक स्तंभ, गंगापूर नाका, कॅनडा कॉर्नर, जुने पोलिस आयुक्तालय, शरणपूर सिग्नल, मायको सर्कल, गोल्फ क्लब येथे रॅलीचा समारोप झाला. रवींद्र मगर, डॉ. मनीषा रौंदळ यांनी सूत्रसंचालन केले. सहाय्यक आयुक्त वसंत मोरे यांनी आभार मानले.

हेही वाचा: Nashik : बंडखोर आमदारांच्या निवास, कार्यालयांबाहेर पोलीस बंदोबस्त

Web Title: Oath For A Drug Free City Cyclist City Police Cycle Rally Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..