Chandrashekhar Bawankule
sakal
नाशिक: इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात काढलेल्या मोर्चात ओबीसी समाजाची पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचे षडयंत्र झाल्याचा आरोप महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा २ सप्टेंबरचा काढलेला अध्यादेश फक्त मराठवाड्यापुरता असल्याचे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले.