International Year of Millets : आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना नाचणीचे पापड! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Students showing papad with nutritional food.

International Year of Millets : आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना नाचणीचे पापड!

कंधाणे (जि. नाशिक) : केंद्रातील वसंतराव दोधूजी बिरारी जनता विद्यालय तिलकेश्वर व रामगीरबाबा जनता विद्यालयात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत व आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्ताने पूरक आहारात विद्यार्थ्यांना तळलेले पौष्टिक नाचणीचे पापड देण्यात आले. (occasion of International Year of Millets school students get nutrition mid day food nagli papad at kandhane nashik news)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने यापूर्वीच्या माध्यान्ह भोजन योजनेत विविध बदल करून आता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सुरू केली आहे.

योजनेंतर्गत मुलांना पोषण आहार नियमितपणे सुरू असून आठवड्यातून एक दिवस केळी, बिस्किटे, अंडी यासारखा पूरक आहार दिला जातो, तसेच २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे केले जात असल्याने तृणधान्यांची विविध स्तरावर व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

त्याअनुषंगाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सुरू असलेल्या शाळांमध्ये तृणधान्यांचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने पोषण आहार योजनेंतर्गत आठवड्यातून दिल्या जाणाऱ्या पूरक आहारात तळलेले नाचणीचे पापड तळून देण्यात आले.