गा बाळांनो श्री रामायण! अमेरिकेत रामनवमी निमित्त बाळगोपाळांनी सादर केले गीत रामायण : Ram Navami 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Geet Ramayan

Ram Navami : गा बाळांनो श्री रामायण! अमेरिकेत रामनवमी निमित्त बाळगोपाळांनी सादर केले गीत रामायण

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : महाराष्ट्रातील चिमुकल्यांचा अमेरिकेत राहून गीत रामायण संगीत यामध्ये डंका वाजताना दिसत आहे. आपली परंपरा आपले सण पारंपारिक आपली वेशभूषा यावर भारत देश हा ओळखला जातो. त्या अनुषंगाने अमेरिकेत राहून सुद्धा आपली परंपरा व परंपरेचा मान राखून या चिमुकल्यांनी महाराष्ट्राचे नाव अमेरिकेत गीत रामायण मध्ये उंच स्थानावर दिले आहे. (occasion of Ram Navami in America children performed geet Ramayana nashik news)

कार्यक्रम पत्रिका

कार्यक्रम पत्रिका

अमेरिकेत गेली ४० - ४२ वर्ष गीत रामायणचा कार्यक्रम डॉ. गोपाळ मराठे आणि त्याचे कुटूंब लॉस एंजेल्स इथे सादर करत आहेत. ग दि माडगूळकर लिखित आणि सुधीर फडके स्वरबद्ध आणि गायन केलेले गीत रामायण हा सुगम संगीताचा कार्यक्रम १९५५ साली पुणे आकाशवाणी वर प्रसारित झाला. तेव्हा पासून मराठी जणांमध्ये गीत रामायणाचे अढळ स्थान आहे.

ह्या वर्षी गीत रामायणच्या कार्यक्रमामध्ये १० ते १३ वर्ष वयोगटातील मुलांनी सहभाग घेऊन गीत रामायण सादर केले. सौरिश गोरे गायन, तबला आणि गायन आदित वैती, रिया मेहेंदळे गायन, हार्मोनियम वर ओमकार गद्रे, कीबोर्ड वर प्रणव कणसे आणि आदिती वैती ह्या सर्वांनी मिळून गीत रामायण सादर केले. ह्या सर्वांना मार्गदर्शन केले संदीप कात्रे, निषाद मराठे, नरेंद्र कुलकर्णी, अमित जेरे, रुपाली मेहेंदळे, माधुरी कुलकर्णी,शुभंकर हिंगणे, मोनाली गद्रे आणि सोनाली भावे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

नाशिक, सिन्नर इथल्या प्रणव कणसे ह्या मुलाने कीबोर्ड वर साथ केली. ह्या सर्व बाळगोपाळांना सुधीर फडके ह्यांचे पुत्र आणि प्रसिद्ध संगीतकार गायक श्रीधर फडके आणि ग दि माडगूळकर ह्यांचे सुपुत्र आनंद माडगूळकर ह्यांनी ध्वनीचित्रफीत द्वारे शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. अमेरिकेत राहून सुद्धा ही लहान मुले गीत रामायण सारखे सांस्कृतिक कार्यक्रम करत आहे.

हा कार्यक्रम लॉस अँजेल्स जवळील ब्रिआ येथील सिद्धिविनायक मंदीर येथे ३०० रसिकांच्या उपस्थित पार पडला. हा कार्यक्रम प्रणव कणसे ह्याने त्याच्या 'चला जाऊ अमेरिकेच्या गावाला' ह्या यु ट्यूब चॅनेल वर थेट प्रसारित केला, आपण 'चला जाऊ अमेरिकेच्या गावाला' ह्या यु ट्यूब चॅनेल वर हा कार्यक्रम पाहू शकतात.