agricultural project
sakal
नाशिक रोड: राज्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी अखंडित दिवसा वीज मिळावी, यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत ओढा येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत ३५ एकरावर सौरऊर्जा कृषी प्रकल्प उभारला आहे. हा प्रकल्प नुकताच कार्यान्वित झाला असल्याची माहिती सरपंच प्रिया पेखळे यांनी दिली.