Nashik Cyber Crime: सोशल मीडियावर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह Tweet! नाशिक पोलिसांकडून संशयिताला मुंबईतून अटक

महापुरुषांविषयी सोशल मीडियाच्या साईटवर आक्षेपार्ह संदेश व्हायरल केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी संशयिताला मुंबईतून अटक केली आहे.
Tweet Crime
Tweet Crimeesakal
Updated on

नाशिक : महापुरुषांविषयी सोशल मीडियाच्या साईटवर आक्षेपार्ह संदेश व्हायरल केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी संशयिताला मुंबईतून अटक केली आहे.

संशयिताविरोधात नाशिक सायबर पोलिसात ॲट्रोसिटीअन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (Offensive tweets about celebrities on social media Suspect arrested from Mumbai by Nashik Police Cyber ​​Crime)

नाशिक सायबर पोलिसात हेमंत तायडे (रा. सिन्नर फाटा, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, @AparBharat या नावाने संशयित अमेय प्रधान (३०, रा. मुंबई) याचे ‘एक्स’ (ट्विटर) या सोशल मीडिया साईटवर हॅण्डल आहे.

संशयिताने त्याच्या हॅण्डल प्रोफाईलवरून महापुरुषांविषयी आक्षेपार्ह संदेश व्हायरल केला आहे. या आक्षेपार्ह संदेशामुळे विशिष्ठ समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन सामाजिक एकोपा व अशांतता निर्माण केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

सदरील हॅण्डल हे अमेय प्रधान याचे असल्याचेही तक्रारीत म्हटलेले आहे. त्यानुसार, नाशिक सायबर पोलिसात ॲट्रोसिटी अन्वये संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tweet Crime
Nashik Crime: चहाविक्रेत्या महिलेची पोत खेचणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या; ग्रामीण पोलिसांच्या गुन्हेशाखेची कामगिरी

दरम्यान, नाशिक पोलिसांनी संशयिताला मुंबईतून गेल्या शनिवारी (ता.९) रात्री अटक केली आहे. त्यास नाशिक न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून सोमवारी (ता.१२) न्यायालयात हजर केले असता, त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

राजकीय दबावाची चर्चा

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांवरही राजकीय दबाव वाढल्याची चर्चा आहे. तसेच, प्रधान याच्या अटकेवरून सोशल मीडियावरही उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

तर सदरचे प्रकरण संवेदनशिल असल्याने यासंदर्भात तपशिल देण्यास पोलिसांकडून नकार देण्यात आला. मात्र, ज्या व्हायरल पोस्टवरून गुन्हा दाखल झाला ती पोस्ट पोलिसांनी एक्सवरून हटविली आहे

Tweet Crime
Nashik Crime : मृत्यूस कारण ठरलेल्या आरोपीला कारावास; दोघांची साक्ष VCद्वारे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Police Strengthen Cyber Crime Investigation With Digital Portals 845 Posts Removed and 132 Cases Registered
Social Media
Model Riya Ahir Cyber Cell Complaint
Who is Prashant Wadile?
Marathi News Esakal
www.esakal.com