'..तर योजना कशा राबविता?'; आढावा बैठकीत संतापल्या भारती पवार |Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharati Pawar

'..तर योजना कशा राबविता?'; आढावा बैठकीत संतापल्या भारती पवार

sakal_logo
By
बाबासाहेब कदम

नांदगाव/बाणगाव बुद्रुक (जि. नाशिक) : तालुक्यातील महसूल, पंचायत समितीच्या स्थानिक यंत्रणेला केंद्रातील योजनांची माहिती देता न आल्यामुळे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार संतप्त झाल्या. तुम्हाला केंद्रातल्या जनकल्याणाच्या योजनांचीच माहिती नसेल तर योजना कशा पद्धतीने राबविता, असा सवाल करीत आढावा बैठकीत उपस्थितांना बसण्याचे नियोजन नसल्याचे बघून आपणही खाली बसतो, अशा शब्दात प्रशासनाला धारेवर धरले.

डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. १९) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तीनला सुरू होणारी बैठक प्रत्यक्षात पाचला सुरू झाली. या बैठकीत केंद्रातील योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याची माहिती मिळत नसल्याने खेद व्यक्त करण्यात आला. अपूर्ण माहिती व अकार्यक्षम प्रशासन यातील अनेक नकारात्मक बाबींनी आढावा बैठक चर्चेचा विषय ठरली. ढिसाळ व्यवस्थेने त्यात भर पडल्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सभागृहात पुरेशी आसन व्यवस्था नसल्याने अनेकांना उभे रहावे लागले. याची दखल खुद्द मंत्री पवार यांना घ्यावी लागली. खुर्च्या मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी धावपळ केली. सगळे आसनस्थ झाले तर सदोष ध्वनीक्षेपण यंत्रणेमुळे बैठकीतले विषय व्यासपिठाजवळ बसलेल्या पुढच्या रांगेशिवाय इतर कोणालाही ऐकू आले नाहीत. त्यामुळे आशेने बैठकीला आलेले कार्यकर्ते व इतरांना गोंधळात बैठकीतील महत्वाचे मुद्दे नीट समजले नाहीत.

हेही वाचा: नाशिक-देवळा महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघे ठार

तहसील कार्यालयाकडून मिळालेली माहिती त्रोटक असल्याचा आक्षेप घेऊन ना. पवार यांनी इंदिरा गांधी लाभार्थींची संख्या कमी आहे. नव्याने सर्व्हे करावा, असे सूचित केले. आकडेवारी कमी आहे म्हणजे काम कमी आहे, असा आक्षेप त्यांनी नोंदविला. देशातल्या इतर ठिकाणी झालेल्या बैठकांचा संदर्भ देत त्यांनी इतर राज्यात यंत्रणा जलदगतीने काम करते, असे सांगितले. योजनेच्या लाभापासून लोक वंचीत राहता कामा नये, अशी कानउघाडणी केली. मनरेगाची कामे वाढवा. त्या माध्यमातून जे अनुदान दिले जाते ते गरजूंसाठी मोठे असते, हे लक्षात घ्या,असे आवाहनही त्यांनी केले.

नांदगाव - मालेगाव, मनमाड - येवला रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याच्या कामाचा आढावा घ्यावा लागतो, हे दुर्दैव आहे खड्डे कधी बुजविणार0 तारीख,वार सांगा अर्धवट रस्त्याची कामे कधी पुर्ण करणार यावर अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली. बैठकीस तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी गणेश चोधरी, तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील, पोलिस निरीक्षक अनिल कातकडे, नितीन पांडे, संजय सानप, सजन कवडे, तालुकाध्यक्ष बापू जाधव, मूनवर सुलतान आदी उपस्थित होते.

हेही वाचा: नाशिक | ST संपामुळे सिटीलिंक मालामाल; रोजचा गल्ला 10 लाखांपुढे

आरोग्य विभागातील समन्वयाचा अभाव उघड

मनमाडच्या लसीकरणसंदर्भात माहिती देता आली नाही. त्यासाठी एकमेकांकडे बोट दाखवण्यात आले. आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे, असे खुद्द ना. पवार यांनाच नमूद करावे लागले. शेवटी कामकाजात सुधारणा झाली नाही तर थेट कारवाई करण्याचा इशारा पवार यांनी दिला. १२०० रेशनकार्डचा प्रस्ताव २०१८ मध्ये देऊनही कार्ड वाटप झाले नाही. कार्ड तत्काळ तयार करा, रेशनकार्ड देण्यास तीन वर्षे लागतात का, याबद्दल खेद व्यक्त केला. जलदगतीने कार्ड द्यावे, यासाठी सोशल मीडियाचा वापर करावा, असा सल्ला ना. पवार यांनी दिला.

loading image
go to top