जुने नाशिक- शहरातील पाणीपुरवठा गेली पाच दिवस विस्कळित होता. जुने नाशिकसह काठे गल्ली, द्वारका परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली होती. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले. शनिवारी (ता. २८) सायंकाळपासून पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पाणीपुरवठा यापुढेही असाच सुरळीत राहू द्या, अशी सादही यानिमित्ताने नागरिकांनी घातली.