कौटूंबिक वादातून वृद्धाची गोदावरीत उडी; जीवरक्षकामुळे वाचले प्राण

attempt to suicide in godavari river
attempt to suicide in godavari riveresakal

नाशिक : कुटूंबियांच्या मानसिक त्रासाला कंटाळून गोदावरी नदीपात्रात उडी घेतलेल्या वृध्दाचे जागरुक जीवरक्षकामुळे प्राण वाचले. सदरील घटना सोमवारी (ता.१९) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. (old man attempts suicide in Godavari from family dispute Life saved by lifeguard Nashik News)

गोपानाथ कोंडाजी त्रिभुवन (६५, रा. लेखानगर, सिडको, नाशिक) असे वृद्धाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्रिभुवन हे मिळेत ते मोलमजुरीचे काम करून उदरनिर्वाह करतात. मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील रहिवाशी असलेले त्रिभुवन सध्या सिडकोत वास्तव्याला आहेत. मात्र कुटूंबियांकडून त्यांना मानसिक त्रास दिला जातो.

सततच्या या त्रासाला कंटाळून अखेर त्यांनी सोमवारी (ता.१९) जीवन संपविण्याच्या हेतूनेच गोदाघाट गाठला. पावसाच्या संततधारेमुळे सध्या गोदावरी दुथडी भरून वाहते आहे. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्रिभुवन यांनी दुतोंड्या मारुतीजवळ येत नदीपात्रात उडी घेतली. नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहताना ते गटांगळ्या खाऊ लागले.

attempt to suicide in godavari river
Nashik : पुराच्या पाण्यात गाडी चालवणं पडलं महागात; महाविद्यालयीन तरूणीचा मृत्यू

गोपानाथ कोंडाजी त्रिभुवन (६५, रा. लेखानगर, सिडको, नाशिक) असे वृद्धाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्रिभुवन हे मिळेत ते मोलमजुरीचे काम करून उदरनिर्वाह करतात. मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील रहिवाशी असलेले त्रिभुवन सध्या सिडकोत वास्तव्याला आहेत. मात्र कुटूंबियांकडून त्यांना मानसिक त्रास दिला जातो. सततच्या या त्रासाला कंटाळून अखेर त्यांनी सोमवारी (ता.१९) जीवन संपविण्याच्या हेतूनेच गोदाघाट गाठला. पावसाच्या संततधारेमुळे सध्या गोदावरी दुथडी भरून वाहते आहे. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्रिभुवन यांनी दुतोंड्या मारुतीजवळ येत नदीपात्रात उडी घेतली. नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहताना ते गटांगळ्या खाऊ लागले. सदरची बाब काठावर असलेले जीवरक्षक दिलीप कुरणे यांच्या लक्षात आली. त्यांनी प्रसंगावधान दाखवत नदीपात्रात उडी घेतली. पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या वृद्धाला त्यांनी गाठले आणि सुरक्षितरित्या नदीपात्रातून रामसेतू जवळून बाहेर काढले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. त्रिभुवन यांच प्राण वाचविणाऱ्या कुरणे यांचे उपस्थित नागरिकांनी कौतूक केले. सध्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे.

attempt to suicide in godavari river
मृत्यूनंतरही वेदना धगधगत्या; चंडीकापूर येथे रस्त्यावरच अंत्यविधी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com