Nashik Fraud Crime : विम्याचे पैसे परतीचे आमिष दाखवून वृद्धाला 81 लाखांना गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud Crime

Nashik Fraud Crime : विम्याचे पैसे परतीचे आमिष दाखवून वृद्धाला 81 लाखांना गंडा

नाशिक : विम्याचे हप्त्याने भरलेले पैसे परत मिळवून देतो व लॉटरीत फ्लॅट मिळाला असून त्याचेही पैसे देण्याचे आमीष दाखवून दोघा भामट्यांनी एका वृद्धास तब्बल ८१ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात अंकितकुमार सक्सेना व राधाकृष्णन पिल्लई या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (old man cheated of 81 lakhs by luring him to return insurance money Nashik Crime News)

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

देविदास मुळे (७४, रा. इंदिरानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सक्सेना व पिल्लई या संशयितांनी सप्टेबर २०११ ते १४ मार्च २०२३ या कालावधीत मुळे यांना गंडा घातला. मुळे यांनी इन्श्युरन्ससाठी भरलेल्या हप्त्यांचे पैसे परत देण्याचे आमीष दोघांनी दाखविले.

त्याचप्रमाणे लॉटरीत तुम्हाला फ्लॅट मिळाला असून तो नको असल्यास त्याचेही पैसे परत मिळवून देतो, असे आमीष दोघा संशयितांनी मुळे यांना दाखविले. पैसे परत करण्याच्या बहाण्याने संशयितांनी मुळे यांच्याकडून विविध कर, फाईल्स तयार करण्यासाठी अशी वेगवेगळी कारणे देत ऑनलाइन पद्धतीने १३ बँकांच्या २४ खात्यांवर ८१ लाख २९ हजार ८८० रुपये घेतले.

मात्र पैसे देऊनही पैसे परत मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुळे यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.