Nashik : वडांगळीला भिंत कोसळल्याने वृद्धेचा मृत्यू

Late Satyabhama Adhangale
Late Satyabhama Adhangaleesakal
Updated on

वडांगळी (जि. नाशिक) : येथील शिवारातील वस्तीवर भरपावसात घराची भिंत कोसळल्याने ज्येष्ठ महिलाचा मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विजेच्या कडकडाटसह पाऊस झाला. (Old woman dies due to wall collapse at Wadangali Nashik Latest Marathi News)

Late Satyabhama Adhangale
Admission 2022 : अकरावीचे 3 दिवसांत 26 टक्‍के जागांवर प्रवेश

शिवारातील वडांगळी-तामसवाडी रस्तालगत वडजाई मंदिरासमोर अढांगळे वस्तीवरील सत्यभामा लाभाजी अढांगळे (वय ८०, रा. वडांगळी) कुटुबासाठी चहा करत होत्या. चहा झाल्यानंतर बाहेर पाऊस असल्याने चुलीजवळ ऊब येण्यासाठी भिंतजवळ बसल्या असता त्या वेळी वीज कडडाली अन् घराची भिंत पडली.

त्यात त्या दबल्या गेल्या. कुटुंबातील युवकांनी त्यांना तत्काळ वडांगळीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या छातीला व हातला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना नाशिकला पाठविले.

येथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. शनिवारी सकाळी वडांगळीला अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रगतशिल शेतकरी आनंदा अढांगळे यांच्या त्या मातोश्री होत.

Late Satyabhama Adhangale
शहरात वाहतूक कोंडी झाली नित्याचीच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com