Shravan Somvar : तिसऱ्या श्रावणी सोमवारी फुलली शिवालये; कपालेश्‍वर सोमेश्‍वरासह छोट्या मंदिरात शिवभक्तांत उत्साह

Devotees line up for darshan of Sri Kapaleshwar Mahadev Temple.
Devotees line up for darshan of Sri Kapaleshwar Mahadev Temple.esakal

Shravan Somvar : ‘बम..बम..भोलेच्या’ गजरात शिवभक्तांनी रामतीर्थासमोरील प्राचीन श्री कपालेश्‍वर महादेवासह तपोवनातील शर्वायेश्‍वर, निळकंठेश्वर महादेव, घारपुरे घाटावरील सिद्धेश्‍वर महादेव, नेहरू चौकालगतचे तीळभांडेश्‍वर, गोदाघाटावरील मुक्तेश्‍वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.

शहरापासून जवळच असलेल्या सोमेश्‍वरलाही पहाटेपासून शिवभक्तांची मोठी गर्दी उसळली होती. नंदी नसलेले एकमेव शिवालय म्हणून नाशिकच्या कपालेश्‍वर महादेवाची देशभर ख्याती आहे. (On third Shravan Monday devotees in Shiva temple for darshan nashik news)

महादेवांनी नंदीसह काहीकाळ वास्तव्य केलेले असल्याने येथे शिवभक्तांची वर्षभर वर्दळ असते. देवस्थानतर्फे दर सोमवारी परिसरातून पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते.

याशिवाय महाशिवरात्री व श्रावणातल्या चारही सोमवारी श्रींच्या पंचमुखी मुखवट्याचा पालखी सोहळा आयोजित केला जातो. कपालेश्‍वरी भल्या पहाटेपासून शिवभक्तांची गर्दी उसळली होती. पहिल्या दोन सोमवारप्रमाणेच महिला व पुरूषांच्या स्वतंत्र रांगा करत पूर्व दरवाजाने प्रवेश, तर दक्षिण व उत्तर दरवाजाने बाहेर पडण्याचा मार्ग निश्‍चित करण्यात आला होता.

विश्‍वस्त मंडळाने संभाव्य गर्दी टाळण्यासाठी स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक, अपंग यांच्यासाठी पहाटे पाच ते सकाळी नऊपर्यंत मागील दाराने दर्शनासाठी खास व्यवस्था केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Devotees line up for darshan of Sri Kapaleshwar Mahadev Temple.
Shravan 2023 : शिवलिंगावर आज करा रुद्राभिषेक, अनेक संकटांतून मिळेल मुक्ती!

रस्ते बंदीस्त

कपालेश्‍वर महादेव मंदिराजवळील जागा अतिशय चिंचोळी आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. श्रावणात होणारी गर्दी लक्षात घेत पंचवटी पोलिसांनी कपालेश्‍वर मंदिराकडे जाणारे रस्ते पहिल्या दोन सोमवारप्रमाणेच बॅरिकेटिंगद्वारे बंदीस्त केले होते. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टळली.

सोमेश्‍वरला रांगा, प्रसादवाटप

शहरापासून पाच सहा किलोमीटर दूर असलेल्या गोदातीरावरील श्री सोमेश्‍वर महादेवाच्या दर्शनासाठीही दिवसभर गर्दी होती. विश्‍वस्तांच्या हस्ते पहाटेची आरती झाल्यावर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. दुपारी बाराच्या आरतीला पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी हजेरी लावली, तर रात्री आरतीस पोलिस अधिकारी प्रशांत बच्छाव उपस्थित होते.

दरम्यान, दुसऱ्या श्रावणी सोमवारप्रमाणेच राबविण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे विश्‍वस्त हरीश शिंदे यांनी सांगितले. भाविकांना एकशेएक किलो राजगिरा लाडूंबरोबरच खिचडीचे वाटप करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी गर्दी होती.

Devotees line up for darshan of Sri Kapaleshwar Mahadev Temple.
Shravan Special : हिंगळजवाडीत गोलाकार फिरणारी महादेवाची पिंड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com